Wednesday, June 18, 2025
Homeगुन्हेगारीसोशल मीडियावर यम भाई म्हणून मिरवणाऱ्या मयूर सरोदेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सोशल मीडियावर यम भाई म्हणून मिरवणाऱ्या मयूर सरोदेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

१५ जुलै २०२१,
वेळ आली आहे दुनियेला सांगायची, मी कोण आहे आणि मी काय करू शकतो असा डायलॉग मातरत आपली सूत्रं येरवडा जेलमधून हालतात म्हणणाऱ्या यम भाईला पोलिसांनी हिसका दाखवताच हात जोडून माफी मागण्याची वेळ आली. पिंपरी-चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने या भाईला खाक्या दाखवताच त्याने हात जोडले. मयूर अनिल सरोदे (२१) असं या यम भाईचं नाव आहे.

मयूर सरोदे व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे दहशत पसरविण्याच्या प्रयत्न करत होता. या प्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर अनिल सरोदे याचे यम भाई नावाचं कपड्यांचं दुकान आहे. त्याने हातात कोयता घेऊन गुन्हेगारी कृत्याला खतपाणी घालणारे डायलॉग जोडून व्हिडीओ काढले होते. यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. मात्र हे व्हिडिओ पिंपरी-चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकापर्यंत पोहोचताच यम भाईला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

मयूर सरोदे याने “तू दिल नसता दिला, तर मी दिलदार नसतो झालो. तू धोका नसता दिला. तर, मी आज गुन्हेगार नसतो झालो….!”; “छक्क्या पंजाचं ऐकून कुत्री पण ताठ चालतात. पण आमची सूत्रं येरवडा जेलमधून हालतात…! लावा ताकद,” अशा प्रकारचे डायलॉग जोडून व्हिडिओ तयार केले आहेत. पण पोलिसांनी कारवाई करताच मात्र त्याची सगळी भाईगिरी उतरली आणि हात जोडून माफी मागितली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments