Sunday, May 17, 2026
Homeताजी बातमी‘ सारथी ’ नागरिक सेवा प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी महापौर रवि लांडगे...

‘ सारथी ’ नागरिक सेवा प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांचे कडक निर्देश

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची ‘सारथी’ ही डिजिटल नागरिक सेवा प्रणाली अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित आणि समाधानकारक निवारण व्हावे, यासाठी ‘सारथी 2.0’ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौरांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रामध्ये ‘सारथी’ प्रणाली केवळ तक्रार नोंदणीपुरती मर्यादित न राहता ती ‘स्मार्ट गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म’ म्हणून विकसित करण्यावर भर दिला आहे. सध्या तक्रारींचे विविध विभागांमध्ये विलंबाने वर्गीकरण, ‘Resolved’ स्थिती आणि प्रत्यक्ष कामामधील विसंगती, डेटा विश्लेषणाचा अभाव, तसेच मोबाईल अॅपच्या User Interface (UI/UX) मधील त्रुटी यांसारख्या समस्यांकडे महापौरांनी लक्ष वेधले आहे.  

महत्वाचे निर्देश

महापौरांनी प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी पुढील उपाययोजना सुचविल्या आहेत:

• तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण व योग्य विभागाकडे त्वरित पाठविणे.

• ‘Resolved’ स्थितीपूर्वी प्रत्यक्ष पडताळणी (Field Verification) अनिवार्य करणे.

• तक्रारींवर मूळ कारण विश्लेषण (Root Cause Analysis – RCA) करून कायमस्वरूपी उपाययोजना.

• विभागनिहाय अधिकाऱ्यांची माहिती प्रणालीत समाविष्ट करणे.

• प्रभावी UI/UX सुधारणा आणि नागरिकांसाठी सुलभ वापर.

• सर्व सेवांसाठी स्पष्ट Service Level Agreement (SLA) निश्चित करणे.

• डेटा सुरक्षा व Disaster Recovery प्रणाली अधिक सक्षम करणे.  

‘सारथी 2.0’ – स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर

महापौरांनी ‘Updated Smart Sarathi Platform’ विकसित करण्यासाठी AI आधारित तक्रार वर्गीकरण, Predictive Analytics आणि Chatbot सुविधा समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी ३० दिवसांत कृती आराखडा आणि ६० दिवसांत सुधारित प्रणालीचा रोडमॅप सादर करण्यास सांगितले आहे.  

डिजिटल सुशासनाकडे महत्त्वपूर्ण पाऊल

महापौर रवि लांडगे यांनी नमूद केले की, “सारथी ही केवळ तक्रार नोंदणी प्रणाली नसून ती नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचे दुवा आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांना जलद, पारदर्शक आणि परिणामकारक सेवा देणे हे महापालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”

‘सारथी 2.0’ च्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका डिजिटल सुशासनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत असून, नागरिकांना अधिक जलद आणि दर्जेदार सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments