Sunday, August 16, 2026
Homeआरोग्यविषयकमोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट; महापालिका...

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी आज मेडिकव्हर हॉस्पिटल तसेच साईनाथ हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी महापौरांनी जखमी नागरिकांशी तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला. या कठीण प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, आवश्यक ती सर्व मदत प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भेटीदरम्यान साईनाथ हॉस्पिटलचे प्रमुख आणि  नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे, महापालिकेतील संबंधित अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रत्येक जखमीच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेण्यात आली. जखमींना सर्वोत्तम दर्जाचे व तातडीचे वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व शासकीय समन्वयाची तातडीने पूर्तता करावी तसेच प्रत्येक बाधित कुटुंबाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशा स्पष्ट सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महापौर रवि लांडगे म्हणाले, “ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून प्रत्येक बाधित कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नागरिकांचे प्राण आणि सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत, त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही अडचण येऊ नये आणि आवश्यक त्या प्रत्येक स्तरावर महापालिका त्यांच्या सोबत राहील. या संकटाच्या काळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्येक बाधित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”

या दुर्घटनेतील जखमी नागरिकांनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे तसेच त्यांच्या कुटुंबियांना या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ लाभावे, अशी प्रार्थना महापौरांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून बचावकार्य, वैद्यकीय उपचार, समन्वय व आवश्यक सर्व प्रशासकीय मदत प्राधान्याने सुरू असून, बाधित नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सतत कार्यरत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments