Wednesday, June 18, 2025
Homeताजी बातमीविविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार

दिव्यांगावर मात देऊन खडतर परिस्थितीतून शिक्षण घेत चार्टड अकौंटंट झालेल्या संतोष फुलारे याच्या सारख्या उमद्या युवकांचा तसेच मिस मुंबई, मिस महाराष्ट्र, मिस एशिया झालेल्या पिंकी तिलोकचंदानी या सारख्या युवतींचा शहराला सार्थ अभिमान असल्याचे गौरवौद्गार महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी काढले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महापौर कक्षात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.या सत्कारास महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे पदाधिकारी गोविंद पानसरे, संभाजी बारणे, हिरामण भुजबळ, अजिंक्य बारणे, आनंदा यादव, सुरेश वाडकर, तसेच माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

आज झालेल्या सत्कारार्थीमध्ये संतोष फुलारे या दिव्यांग युवकाचा सन्मान करण्यात आला. संतोष यांनी ९ वी मध्ये असताना सन २००१ मध्ये झालेल्या अपघातात डावा पाय गमावल्यानंतरही खचून न जाता मिळणा-या वेगवेगळ्या शिष्यवृत्तींवर शिक्षण पूर्ण करुन ते चार्टर्ड अकौउटंट झाले.याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.पिंकी तिलोकचंदानी या युवतीने अथक परिश्रम करुन मिस मुंबई, मिस महाराष्ट्र आणि यावर्षीचा मिस एशिया इंटरनॅशनल दुबई २०२१ असे पुरस्कार मिळविल्याबद्दल तसेच वन्य प्राणीमात्रांवर केलेल्या कार्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. मुझफ्फर इनामदार हे पर्यावरणप्रेमी असून त्यांनी पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून पर्यावरण विषयक जनजागृती नदी, नाले स्वच्छतेसाठी कार्य केले आहे तसेच ते माजी संपादक देखील होते. तसेच सिकंदर घोडके यांचा देखील पर्यावरण विषयक कार्याबद्द्ल सत्कार करण्यात आला.

पुजा मनोज जव्हेरी या १४ वर्षीय मुलीने वयाच्या ४ थ्या वर्षी त्वायक्वांदो खेळात सहभाग घेतला. वयाच्या १२ व्या वर्षी ब्लॅक बेल्ट तर २०१७ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार, तसेच राष्ट्रीय पातळीवर ४ सुवर्ण पदके आणि राज्य पातळीवर ३ सुवर्ण पदकांसह आतापर्यंत २२ पदके मिळवली आहेत.चंद्रकांत धोंडीबा वाघोले या सामाजिक कार्यकर्त्याने सामाजिक बांधिलकी जपून हजारो युवक युवतींचा विवाह घडवून आदर्श निर्माण केला याशिवाय ते इतर सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असतात. किसन मारुती खैरे यांनी देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन पाहिला आहे तसेच ते जेष्ठ नागरिक असून सामाजिक कार्यात सतत सहभागी असतात. बाळासाहेब धोंडीबा हरगुडे हे महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. ते राष्ट्रीय खेळाडू असून ४० वर्षे वारीचे नियोजनात सहभागी असतात.

आज सत्कार झालेल्या व्यक्ती सामाजिक क्षेत्रात देखील काम करतात. पर्यावरण, सामाजिक उपक्रम जनजागृती मध्ये कायम सहभागी असतात याचा शहराला सार्थ अभिमान आहे असे महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments