Sunday, August 16, 2026
Homeआरोग्यविषयकयशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे नवीन बालरोग वॉर्डचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे नवीन बालरोग वॉर्डचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

५ ऑगस्ट २०२१,
लहान मुलामुलींना झालेल्या आजाराबाबत त्यांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी अतिशय कल्पकतेने नवीन बालरोग वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याचा उपयोग लहान मुलामुलींसाठी भिंतीवरील पंचतंत्र गोष्टी व कार्टुनच्या सहाय्याने त्यांच्या आजाराची तीव्रता कमी होण्यासाठी निश्चितच होईल असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे नवीन बालरोग वॉर्ड तयार करण्यात आला आहे त्याचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, बालरोग विभागप्रमुख डॉ. दिपाली अंबिके, डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. राजेश कुलकर्णी, डॉ. सीमा सोनी, डॉ. सुर्यकांत मुंडलोड आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments