३० सप्टेंबर २०२१,
नियत वयोमानानुसार माहे सप्टेंबर २०२१ अखेर सेवानिवृत्त होणारे तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अधिकारी ,कर्मचाऱ्यांचा सत्कार महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज करण्यात आला.या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड.नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक , कर्मचारी महासंघाचे गोरख भालेकर , सुप्रिया सुरगुडे , गणेश भोसले , तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते.
माहे सप्टेंबर २०२१ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये सहाय्यक आरोग्याधिकारी रमेश भोसले, मुख्याध्यापक विलास सोकटे, कनिष्ठ अभियंता बाळकृष्ण भावड, उपशिक्षक सुभाष चटणे, सहाय्यक शिक्षक शोभा भोसले, वायरमन सुभाष खोंड, फायरमन कैलास डोंगरे, मुकादम आशा जाधव ,बाळासाहेब वाघेरे, रखवालदार दत्ताराम मोरे, मजूर चंद्रकांत बाराथे ,हिरामण साळुंखे, सफाई कामगार पार्वती भोसले, कचराकुली उत्तम विटूले, गटरकुली शाम माळी यांचा समावेश आहे.
तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेले उपशिक्षक आशा बळवतकर, ग्रंथपाल सुचित्रा फुलमामडीकर, सफाई कामगार गहिनीनाथ कांबळे ,पद्मा गायकवाड ,लक्ष्मी कुंटेवन, सफाई सेवक लिलावती लोट, जयश्री ढांगेजी यांचा देखील सत्कार करण्यात आला.
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे माहे एप्रिल २०२१ मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला नव्हता. त्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आज करण्यात आले. एप्रिल मधील सेवानिवृत्तांमध्ये जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. जॉन सुनील, नेत्रतज्ञ लिना काद्यान, प्रशासन अधिकारी अवधूत तावडे, मुख्याध्यापक सुजाता खणसे, कार्यालयीन अधिक्षक संभाजी घुले, सदाशिव सुभेदार, नंदुकुमार मोरे, ए.एन.एम मंजुषा इंगळे, मुख्य लिपिक मुगटराव सावंत, उपशिक्षक स्मिता देशपांडे, आरोग्य सहाय्यक विजय काळभोर, सुरक्षा सुपरवायझर किसन मुटके, मुकादम रमेश गव्हाणे, शिपाई पांडुरंग काताळकर, राजाराम कदम, रखवालदार रविंद्र देशमुख, मजूर चंद्रकांत कुटे, गटरकुली नंदू देवकर यांचा समावेश आहे. तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी मुकादम रंगनाथ तरंगे ,विजया जाधव, सफाई कामगार मंगला आरडे, लता गायकवाड , आशा तुपे , साधना चावरीया ,मंगल सोनटक्के, कौसल्या बावरे, सरस्वती मोरे, संगीता वाळके, गजराबाई लखन, कचरा कुली अशोक साळवे, उल्का सोनवणे, महानंदा सोनवणे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
कार्याक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.