Sunday, May 17, 2026
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवडमध्ये ‘मॅक्स मंथन एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न; १३ समाजभूषण रत्नांचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मॅक्स मंथन एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न; १३ समाजभूषण रत्नांचा गौरव

सत्याचा शोध आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ चा प्रथम वर्धापन दिन आणि ‘मॅक्स मंथन एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ वितरण सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३ रत्नांना ‘मॅक्स मंथन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी भूषविले. व्यासपीठावर मुंबई हायकोर्टाच्या ज्येष्ठ एडवोकेट राजेश्वरी भोसले, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के, ज्येष्ठ पत्रकार बाबू उर्फ सुनील कांबळे,सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर श्रद्धा प्रभुणे, संदीप काटे, एडवोकेट प्रवीण जगताप, पीएसआय अतुल जगताप, नाट्यकर्मी संतोष रासने, युवा उद्योजक दीपक रोकडे, ज्येष्ठ नागरिक सुधाकर कुंजीर, स्वर्गीय राजीव गांधी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश नवले, ओबीसी संघर्ष समितीचे शहराध्यक्ष आनंदा कुदळे, पिंपरी lIB चे पोलीस संदीप पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनता संपर्काचे मुख्य लिपिक अभिजीत डोळस, राष्ट्रीय कबड्डीपटू विष्णू जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नढे, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या सुमन कुंजीर, पत्रकार देवा भालके, सुलतान लघुपटाचे जागतिक अवॉर्ड विजेते अविनाश खांबीकर, पीसीएमसी न्यूज चे सर्वेसर्वा मुकेश जाधव, नारी द मन संस्थेच्या परवीण शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे म्हणाले की, “लोकशाहीचा चौथा स्तंभ टिकवण्यासाठी निस्पृह पत्रकारितेची गरज आहे. ‘मॅक्स मंथन’ने एका वर्षात विश्वासार्हता कमावली असून, समाजातील चांगल्या कामाची दखल घेणे हे जिवंत पत्रकारितेचे लक्षण आहे. सध्या टेलिव्हिजनवर चालू असलेल्या न्यूज चैनल च्या बातम्या किती खऱ्या आहेत याच्यावर शंका निर्माण होत असते त्यामुळे त्वरित आणि झटपट बातमी मिळवायचे असेल तर अशा पोर्टलच्या बातम्यांचा उपयोग नक्कीच होतो.”

सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, “मॅक्स मंथन डेली न्यूज चे भाई विशाल जाधव हे आमचे वीस पंचवीस वर्षाचे मित्र आहेत सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना घेतलेला दांडगा अनुभव आज त्यांनी आपल्या पत्रकार दिनाच्या लेखणीमध्ये प्रत्यक्षात उतरवला खऱ्या अर्थाने त्यांनी अल्पवधीमध्येच या क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिके मधील वेगवेगळ्या कामावर त्यांचे अचूक लक्ष असते. नारीशक्ती काय असते हे आमच्या वहिनी सौ प्राजक्ता जाधव यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते खऱ्या अर्थाने पडद्यामागच्या मुख्य सूत्रधार त्याच आहेत.”

पुरस्कारार्थींची नामावली:

या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार (कला गौरव), अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे (प्रशासकीय सेवा), डॉ. हनुमंत चव्हाण (धन्वंतरी गौरव), अमोल डोळस (समाज गौरव), भरत काटे (हॉटेल उद्योग रत्न), नॅशनल नेमबाज समिता गोरे (क्रीडा रत्न), दयानंद मालगे (युवा उद्योजक), अर्चना मेंगडे (सामाजिक क्रांती), श्रद्धा रोकडे (स्त्री शक्ती गौरव), राजू बंग (कलारत्न), शिल्पकार महेंद्र थोपटे (वास्तु कलारत्न), गिरीश चिद्दरवार (वास्तु कलारत्न) आणि निलेश जवळकर (युवा उद्योजक गौरव) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘मॅक्स मंथन’चे संपादक विशाल जाधव यांनी केले. त्यांनी चॅनेलच्या वर्षभराच्या प्रवासाचा आढावा घेत सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. सौ. प्राजक्ता जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ज्येष्ठ पत्रकार शिवाजी घोडे यांनी कार्यक्रमाचे उत्तम समन्वय साधले. प्रसिद्ध कथक नृत्यांगना फिरोज मुजावर आणि त्यांच्या टीमने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्याची रंगत वाढवली. प्रसिद्ध चौघडा वादक रमेश पाचंगे यांनी पुरस्कार सोहळ्याला एक वेगळीच रंगत आणली त्यांचाही सन्मान यावेळी माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे साहेब यांच्या हस्ते घेण्यात आला.

मॅक्स मंथन पुरस्कार सोहळ्याची समितीचे अध्यक्ष सदस्या एडवोकेट विद्या शिंदे, एडवोकेट प्रियंका ढगे, कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक शिवाजी घोडे, यांना उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

साठे हॉस्पिटलिटी चे सर्वेसर्वा नीलिमा साठे ,निलेश साठे व त्यांच्या टीमचे विशेष सहकार्य म्हणून सन्मान करण्यात आला त्यांचा सन्मान शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आला.

या सोहळ्याला शहरातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उल्लेखनीय सहकार्य करणारे ऋत्विक पवार, मनोज प्रधान, भैय्या जगधने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंथन जाधव यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments