Friday, December 6, 2024
Homeताजी बातमीमवाळ लोकसभा - मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत खासदार श्रीरंग बारणे यांनी भरला...

मवाळ लोकसभा – मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत खासदार श्रीरंग बारणे यांनी भरला उमेदवारी अर्ज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज सोमवारी (22 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

सकाळी 10 वाजता आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुक काढण्यात आली. पीएमआरडीए कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, दरेकर यावेळी उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, महेंद्र थोरवे, महेश बालदी, उमा खापरे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिंचवड, पिंपरी, मावळ, कर्जत-खालापूर, पनवेल व उरण या सहाही विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते आकुर्डी येथे आले होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खासदार बारणे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करीत प्रचारात आघाडी घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments