Friday, September 11, 2026
Homeताजी बातमीअनुसुचीत जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ १८ ऑगस्टला पिंपरी-चिंचवडमध्ये मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा

अनुसुचीत जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ १८ ऑगस्टला पिंपरी-चिंचवडमध्ये मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा

चिंचवड स्टेशन ते निगडी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा; विविध समाजघटकांचा पाठिंबा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :

अनुसूचित जाती आरक्षणाच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड शहरात १८ ऑगस्ट २०२६ रोजी मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन मातंग समाज कृती समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोर्चाची सुरुवात सकाळी १० वाजता चिंचवड स्टेशन येथील गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यापासून होणार असून, तेथून मोर्चा चिंचवड स्टेशनमार्गे निगडी तहसील कार्यालयावर पोहोचणार आहे. तहसील कार्यालय येथे मोर्चाचा समारोप करण्यात येणार असून, आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसंदर्भातील निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे.

लोकशाही मार्गाने मागणी मांडणार

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची भूमिका अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. संविधानिक आणि लोकशाही मार्गाने समाजाचा आवाज शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

मोर्चाच्या तयारीसाठी शहरातील विविध भागांमध्ये विभागनिहाय बैठका, जनजागृती मोहीम आणि समाजबांधवांशी प्रत्यक्ष संपर्क सुरू आहे. प्रत्येक भागातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी व्हावेत, यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

वाल्मिकी, मादीगा, खाटीक समाजाचा पाठिंबा

या मोर्चाला वाल्मिकी, मादीगा आणि खाटीक समाजानेही समर्थन दिले असून, संबंधित समाजबांधव मोर्चात सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे १८ ऑगस्टच्या मोर्चात विविध समाजघटकांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

सकल मातंग समाजाला सहभागी होण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील सकल मातंग समाजबांधवांनी मोठ्या संख्येने, शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन मातंग समाज कृती समिती, पिंपरी-चिंचवड शहरयांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोर्चाची माहिती :

📅 दिनांक : १८ ऑगस्ट २०२६

⏰ वेळ : सकाळी १० वाजता

📍 प्रारंभ : गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे पुतळा, चिंचवड स्टेशन

➡️ मार्ग : चिंचवड स्टेशन ते निगडी तहसील कार्यालय

🏁 समारोप : निगडी तहसील कार्यालय

संपर्क : 9503093322 | 9545525252 | 9763737389 | 9922139926 | 9604435343

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments