पिंपरी-चिंचवड शहरात अनुसूचित जातींमध्ये अ.ब.क.ड. उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी भव्य निदर्शने आंदोलन पार पडले. निगडी येथील तहसीलदार कार्यालय, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात आयोजित या आंदोलनात शहरातील विविध समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या आंदोलनात मातंग समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे विचार प्रबोधन पर्व आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वचे आजी-माजी अध्यक्ष, पदाधिकारी व माजी-विद्यमान नगरसेवक उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान मातंग समाज व इतर पोटजातींच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्यात आली. विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात आली आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आंदोलनानंतर अपर तहसीलदारांसह तहसीलदार जयराज देशमुख यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी श्री संदिपान झोंबाडे, श्री भाऊसाहेब अडागळे, श्री अनिल सौंदडे, श्री मारुती जाधव, श्री युवराज दाखले, श्री बाबासाहेब रसाळ, श्री नितीन घोलप, श्री अरुण जोगदंड, श्री संजय ससाने, चंद्रकांत लोंढे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच, भगवान शिंदे, बाबू पाटोळे, अण्णासाहेब कसबे, अविनाश कांबीकर, अविनाश शिंदे, डी.पी. खंडाळे, नाना कसबे, अमोल कुचेकर, निलेश गायकवाड, आनंद कांबळे, विशाल कसबे, शंकर खवळे, सुनील भिसे, राजू आवळे, धीरज सकट, सविता आव्हाड, कविता बोराडे, अमोल कुचेकर, अश्विनी जाधव, हिरामण खवळे, गणेश लोंढे, सनी गवई, मारुती सोनटक्के, अण्णा लोखंडे, विठ्ठल शिंदे, स्वप्नील वाघमारे, अमोल खंडागळे आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
या आंदोलनामुळे अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या मागणीला पुन्हा एकदा जोर मिळाल्याचे चित्र दिसून आले असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.


