महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी गायिलले, मराठी बाणा प्रज्वलीत करणारे “मराठी मराठी रे धर्म माझा मराठी ” हे मी मराठी शिर्षक गीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. मराठी विभाग प्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर व मराठी उद्योजक व्ही. एस. किरपेकर यांच्या हस्ते प्रदर्शित झाले. त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ, निर्माता एम. के. धुमाळ, दिग्दर्शक विनोद जमधाडे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात साहित्यिक कामगार आत्माराम हारे, शामराव सरकाळे , सुभाष चव्हाण, मुरलीधर दळवी, महेंद्र पाटोळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपली एक एक कविता सादर करुन रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रमात प्रदर्शित झालेले मी मराठी हे गीत राजन लाखे यांच्या लेखणीतून साकार झाले असून या गीताचे चित्रिकरण सासवड च्या परिसरात झाल्याचे दिग्दर्शक विनोद जमधाडे यानी सांगीतले. या गीताच्या माध्यमातून तलवार, दांडपट्टा, भाला, इत्यादीचा बाज, मराठी माती, मराठी शेतकरी, बाबासाहेब आंबेडकारांची सविन्धान लिहणारी लेखणी शिवाजी महाराजांची भवानी तलवार आदिचे दर्शन घडते असे प्रतिपादन सांगोलकर यांनी केले.
उद्योजक किरपेकर, निर्माता धुमाळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांमध्ये लॉयन्स क्लबचे मा. अध्यक्ष वसंत गुजर, ज्येष्ठ नागरिक संघाचे मा. अध्यक्ष मुथियान, प्रकल्प प्रमुख नितीन बोराटे हजर होते.श्रीकांत जोशी, जयश्री श्रीखंडे, किरण लाखे, किशोर पाटील, प्राची कुलकर्णी विनीता श्रीखंडे यांनी संयोजन केले. राजन लाखे यांनी प्रास्तविक केले. संजय जगताप यांनी सुत्रसंचालन केले तर ऐनापुरे यांनी आभार मानले.