‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने 3 (Maharashtra) आठवड्यांनंतर अवघ्या 58 कोटींचा गल्ला कमावला आहे. मराठी चित्रपटासाठी तिसऱ्या आठवड्यात ही कमाई अत्यंत चांगली असून, मराठी प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे व त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून यात 6 प्रसिद्ध अभिनेत्री या बहिणींच्या मुख्य भूमिकेत आहेत.
पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने 12 कोटी कमावले होते व दुसऱ्या आठवड्यात साधारण 24 कोटी कमावले होते. तिसऱ्या आठवड्यात 21 कोटींची कमाई करून चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीवर सध्या स्वतःचे वर्चस्व गाजवले आहे.चित्रपट प्रदर्शित करण्याची वेळ हि निर्मात्यांनी अत्यंत चांगली निवडली असून, चित्रपटाला सक्षम अशी स्पर्धाच कुठली दिसून येत नाहीये.
निर्मात्यांनी माध्यम वर्गीय गृहिणींना केंद्रस्थानी ठेऊन चित्रपट बनवला आहे. त्यामुळेच चित्रपटाला सुरुवातीपासून महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.स्वतःच्या पहिल्याच आठवड्यात ‘आदिपुरुष’ पडल्यावर चित्रपटाला बाकी वयोगटाचे सुद्धा प्रेक्षक मिळाले आणि हा चित्रपट आता धावत सुटला आहे.
केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब, शरद पोंक्षे यांच्यासारखे कर्तृत्ववान व ज्येष्ठ कलाकारांचा स्टार कास्ट असून, चित्रपटाला घेऊन मराठी सिनेमा रसिकांच्यात आधीपासूनच उत्सुकता होती.त्यावरून इतर चित्रपटांना घेऊन झालेल्या घडामोडींमुळे चित्रपटाला अजून जास्त चांगली चालना मिळाली.चित्रपटाची कथा म्हणजे वेळेमुळे परक्या पडलेल्या सहा बहिणी मंगळागौरी स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवतात आणि त्यांच्या बालपणीच्या घरी सरावासाठी एकत्र येतात.
त्या त्यांच्या भूतकाळावर मात करून व त्यांच्या कौटुंबिक संघर्षांना तोंड देऊन कशा स्पर्धेमध्ये भाग घेतात अशी ही अनोखी गोष्ट आहे. ही गोष्ट बऱ्याच गृहिणींना मनापासून पटते व पुरुष मंडळींनाही विचार करायला भाग पडते, म्हणून चित्रपटाचे वेड काही कमी होत नाहीये