Tuesday, November 12, 2024
Homeताजी बातमीबाॅलिवूड सिनेमांचा फ्लाॅप शो होत असताना बाॅक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाची बाजी… !

बाॅलिवूड सिनेमांचा फ्लाॅप शो होत असताना बाॅक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाची बाजी… !

सध्या बाॅक्स ऑफिसवर हिंदी सिनेमांचं काही खरं नाही. मोठमोठे सिनेमे फ्लाॅप झाले. लाल सिंग चड्ढा, रक्षाबंधन आणि आता रिलीज झालेला दोबारा या सिनेमांची अवस्था फारच वाईट झाली. पण अशात मराठी सिनेमा ‘दगडी चाळ २’नं मात्र कमाल केली. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

२०१५ ला आलेल्या ‘दगडी चाळ’नंतर यंदा ‘दगडी चाळ २’ ने यशाचा झेंडा रोवला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात झुंबड उडवली आहे. प्रत्येक डायलॉगवर शिट्ट्या किंवा टाळ्या थिएटरमध्ये ऐकू येतात.

हा चित्रपट ३५० हून अधिक स्क्रीनवर दाखवला जात आहे. प्रेक्षकांचा मिळणारा तुफान प्रतिसाद खरंच थक्क करणारा ठरला आहे. दहीहंडीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून अवघ्या ३ दिवसात २,०५,३४,८१४ रुपयांचा कमाल गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ५१,८२,७४५ रुपये तर दुसऱ्या दिवशी ७०,४८,३७२ रुपये आणि तिसऱ्या दिवशी चक्क ८३,०३,६९७ रुपयांचा विश्वसनीय गल्ला जमवलेला आहे.

‘शंभो’ म्हणत अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या मकरंद देशपांडे यांचा कमाल अभिनय, सूर्याची भूमिका साकारणारा अंकुश चौधरी तर कलरफुल पूजा सावंतने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचाही उत्तम प्रतिसाद आहे.निर्मात्या संगीता अहिर म्हणतात,” प्रेक्षक आणि समीक्षकांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम पाहून मन आनंदाने भरून आलं आहे. ‘दगडी चाळ’ सिनेमाप्रमाणेच ‘दगडी चाळ २’ला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. कष्टाचं चीज झाल्याचं वाटत आहे. इतक्या कमी वेळात मिळालेल्या उत्तुंग यशानंतर मी निःशब्द झाले आहे. सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम कायम करीत राहाल अशी आशा आहे .”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments