पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे एका इमारतीमध्ये अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या बिल्डिंगमध्ये दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू होऊन तीन दिवस उलटून गेले तरी कोणाला या गोष्टीचा पत्ता नव्हता. अखेर त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे या सगळ्याचा उलगडा झाला. रवींद्र महाजनी यांनी प्रकृती ठीक नसल्याने ते हवापालटासाठी तळेगाव येथे आले होते. तळेगाव दाभाडेमधील आंबी इथल्या क्सर्बिया सोसायटीमध्ये ते भाडेतत्त्वावर राहत होते. या घरात ते एकटेच असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कोणाला समजू शकले नाही. रवींद्र महाजनी गेल्या आठ महिन्यांपासून याठिकाणी राहत होते. मात्र, त्यांचा आजुबाजूच्या लोकांशी फार संपर्क नव्हता. इमारतीमध्ये कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या महिलेशी रवींद्र महाजनी यांचा दररोज जुजबी संवाद व्हायचा. रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूपूर्वी त्यांचा शेवटचा संवाद याच महिलेशी झाला होता. आदिका वारंगे असे या महिलेचे नाव आहे.
आदिका वारंगे या सफाई कर्मचारी असून त्या दररोज इमारतीमधील कचरा गोळा करायच्या. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मी कधी कधी महाजनी यांना पाण्याची बाटली आणल्यावर दरवाजापर्यंत नेऊ द्यायची. बुधवारी माझी सुट्टी होती. त्यामुळे मी कचरा घ्यायला गेले नव्हते. मंगळवारी रवींद्र महाजनी यांनी स्वत: माझ्या हातात कचरा दिला होता. कचरा देताना ते थोडफार बोलत असत. मी कचरा घेण्यासाठी दरवाजा ठोठावल्यानंतर ते आतून आवाज द्यायचे. मी काल सकाळी त्यांच्या घरी कचरा घेण्यासाठी गेले तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांना हाका मारल्या, दरवाजा ठोठावला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने मी निघून आले. मला वाटलं ते झोपले असतील, मग मी दुपारी कचरा घ्यायला गेले. तेव्हाही मी दरवाजा वाजवला, पण त्यांनी दार उघडले नाही. दुपारी त्याठिकाणी वास येत असल्याचे समजल्यानंतर मी पुन्हा रवींद्र महाजनी यांच्या घराकडे केले, तिकडे काही आहे का, हे मी पाहिले. मात्र, तिकडे काहीही कचरा किंवा घाण नव्हती, असे आदिका वारंगे यांनी सांगितले.