Monday, December 4, 2023
Homeमहाराष्ट्रपिंपरीत मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलनकर्ते आक्रमक सरकारचा घातला दशक्रिया विधी…आंदोलनकर्त्यांनी केले मुंडन

पिंपरीत मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलनकर्ते आक्रमक सरकारचा घातला दशक्रिया विधी…आंदोलनकर्त्यांनी केले मुंडन

मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत. पिंपरी- चिंचवडमध्ये मराठा समाजाला आरक्षण न देणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचा दशक्रिया विधी करण्यात आला. यावेळी मराठा आंदोलकांनी मुंडन करत निषेध केला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये सरकारने योग्य तो निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक सतीश काळे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रासह देशभर मराठा आरक्षण मुद्दा गाजतो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्याचबरोबर आंदोलनकर्ते देखील सरकारच्या विरोधात ठिकठिकाणी उपोषण आणि आंदोलन करत असल्याचं बघायला मिळत आहे. आज पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये देखील मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी मोरया गोसावी या घाटावर शिंदे- फडणवीस- अजित पवार सरकारचा जाहीर निषेध करत दशक्रिया विधी घातला, त्याचबरोबर मुंडन देखील केले. वेळीच या सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढावा अन्यथा पुढील दोन दिवसांमध्ये अधिक आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा मराठा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. यावेळी या आंदोलनामध्ये महिलांचा देखील सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments