Saturday, March 2, 2024
Homeताजी बातमीभाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात… उपमुख्यमंत्री अजित पवार

भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात… उपमुख्यमंत्री अजित पवार

१८ सप्टेंबर २०२१,
महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी आवश्यक ताकदीची मॅजिक फिगर गाठण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश देण्यासाठी इलेक्टिव्ह मेरिट पाहणार आहे. काही कारणांमुळे जे पक्ष सोडून गेले, ते परत येत असतील तर त्यांना सामावून घेतले जाणार आहे, असे आवतन व संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले.

आकुर्डीतील एका कार्यक्रमासाठी पवार आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंगसाठी पक्षाचे दरवाजे उघडे आहेत का? असे विचारले असता ,पवार म्हणाले ज्यांचे इलेक्टिव्ह मेरिट आहे. आमच्याकडे असणाऱ्या कार्यकर्त्यापेक्षा ताकदीचा नगरसेवक व उमेदवार येणार असेल, तर त्यांचे स्वागतच आहे. कोणत्याही निवडणुकीत सत्तेसाठी मॅजिक फिगर महत्त्वाची असते. राज्यात २८८ पैकी ज्यांच्याकडे १४५ आमदार आहेत, तेच राज्यात सरकार स्थापन करू शकतात तसेच महापालिकेतही आहे.

या मॅजिक फिगरसाठी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजेत. सर्वांना माहिती आहे की, भाजपतील आताचे कितीतरी नगरसेवक आहेत की पाठीमागच्या कालखंडात मी त्यांना संधी दिली, त्यांना वेगवेगळी पदे दिली तरीही ते तिकडे गेले.

भाजपचे किती नगरसेवक संपर्कात आहेत, या प्रश्नावर पवार म्हणाले, भाजपचे अनेक नगरसेवक संपर्कात आहेत. अन्य पक्षातील जे कोणी आले, तर त्यांचे पक्षातर्गत बंदी कायद्यांतर्गत नगरसवेकपद रद्द होऊ शकते. ते अपात्र झाले तर सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे आता पक्षात आलेले काहीजण अपक्ष नगरसेवक किंवा विद्यमान नगरसेवकांचे पती आहेत. त्यामुळे पक्षांतर करताना सर्वांनी काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.

राजकारणात चढउतार सुरू असतात. २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभर लाट होती. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप सत्तेत आला. पण सत्तेचा वापर कशा पद्धतीने झाला. वॉर्ड चारचा करत असताना कुठला भाग काढायचा. हे त्यांनी ठरविले. असे यापूर्वी मी कधीच केले नाही. खालच्या पातळीचे राजकारण कधीच केले नाही. महापालिकेतील सत्तेचा त्यांनी गैरवापर केला. आपण काम केले तर लोक निवडून देणार, वॉर्डमधून याला वगळा, त्याला घ्या, असे काही नसते, असे माझे मत होते. परंतु, इतके काम करूनही आम्हाला जनतेच्या दिलेल्या कौलामुळे विरोधी पक्षात बसावे लागले, अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments