मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) विभागात बदली करण्यात आली आहे.
यापूर्वी सचिन वाझे हे मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. मात्र, मनसुख हिरेन प्रकरणामुळे आता त्यांना CFC विभागात पाठवले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरुन हटवल्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून सचिन वाझे यांची बदली आता कोणत्या विभागात होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली आहे. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.