Sunday, November 10, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगे पाटील यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप

मनोज जरांगे पाटील यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात मोठी बातमी येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी समाजाला संबोधित केले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र होत आहे. अशात आता मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. आपल्याला जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यामागेही देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“मला सलाईनमधून वीष पाजून मारण्याचा कट रचला. त्यामुळेच मी परवापासून सलाईन घेणंही बंद केलं आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मला मारायचंच असेल, तर येतो मी सागर बंगल्यावर, मला मारून दाखवा”, असं आव्हान जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलं आहे.

“मी आता चालत सागर बंगल्यावर जातोय. तिथे उपोषण करेन. जर रस्त्यात मी मेलो, तर मला देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर नेऊन टाका. आता मी एकतर मराठा आरक्षणाचा गुलाल तरी घेऊन येतो, नाहीतर देवेंद्र फडणवीसांना माझा बळी तरी देतो”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

एकनाथ शिंदे सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करतील. परंतु फडवणीस करू देत नाही. अंतरावालीमध्ये महिलांवर हल्ला झाला. त्या प्रकरणात फडणवीस यांना माफी मागावी लागली. त्यामुळे माझ्यावर फडवणीस यांचा राग आहे. त्याचे जो ऐकत नाही त्यांना ते संपवतात. त्यांना मला बदनाम करायचे आणि संपवायचे आहे. फडणवीस यांना कोणी पुढे गेलेले आवडत नाही. त्यांच्यामुळे पक्षातील लोकही त्यांना सोडून जात आहे. खडसे, पटोले फडणवीस यांच्यामुळे सोडून गेले.

महादेव जानकर यांनाही फडणवीस यांनी मोठे होऊ दिले नाही. बामणी कावा माझ्या पुढे चालणार नाही. मी पायी तुझ्या कडे येत आहे, तुझ्या दारात येत आहे. माझा बळी घेऊन दाखवा. माझ्या उपोषणा दरम्यान मृत्यू झाल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका. खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे. बारसकर, राणेंच्या मागून माझ्यावर हल्ला करु नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments