Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव, उपोषणाचा पाचवा दिवस मात्र उपचार घेण्यास...

मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव, उपोषणाचा पाचवा दिवस मात्र उपचार घेण्यास नकार

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात झालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा उपोषण सुरु केलं आहे. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतो आहे अशी माहिती समोर आली आहे. कुठल्याही प्रकारचे उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. सगेसोयऱ्यांसाठीच्या कायद्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस…
सगे-सोयरे यांच्याविषयीचा जो अध्यादेश राज्य सरकारने आणला आहे त्याचं रुपांतर कायद्यात करा अशी प्रमुख मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास सातत्याने नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मंगळवारी जिल्हा आरोग्यपथक आंतरवली सराटीमध्ये दाखल झालं. मात्र रक्तदाब तपासण्यासही मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. आमच्याकडून दर तासाला त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते आहे. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यांनी किमान पाणी घेतलं पाहिजे मात्र त्यासाठीही त्यांनी नकार दिला आहे असं वरिष्ठ डॉक्टरांनी मंगळवारी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतो आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरूवात झाली आहे. मंगळवारी रात्री जालना –जळगाव मार्गावर टायर जाळण्यात आले. तर हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला. लातूर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज बंद पुकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. तर मालेगावमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत. टीव्ही ९ मराठीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments