Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा उद्या पिंपरी चिंचवड शहरात ,असा असेल वाहतुकीत...

मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा उद्या पिंपरी चिंचवड शहरात ,असा असेल वाहतुकीत बदल 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा सुरू केली आहे. आज (दि.२३) रोजी चंदननगर (खराडी बायपास) पुणे येथे या पदयात्रेचा मुक्काम असणार आहे. तर उद्या बुधवार (दि.२४) रोजी ही पदयात्र पिंपरी चिंचवड शहरातून मुंबईकडे रवाना होणार आहे. ही पदयात्रा औंध येथील राजीव गांधी ब्रिज जगताप डेअरी- डांगे चौक- बिर्ला हॉस्पीटल, चाफेकर चौक- अहिंसा चौक महाविर चौक- खंडोबामाळ चौक, टिळक चौक – भक्त्ती शक्ती -पुना गेट- देहूरोड- तळेगाव मार्गे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.

त्या अनुषंगाने उद्या (दि.२४) रोजी सकाळी ६ वाजल्यापासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतूकीमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. हा बदल तात्पुरत्या स्वरुपात पदयात्रा शहरातून मार्गस्थ होईपर्यंत असणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे.

सांगवी वाहतूक विभाग

१. औंध डी मार्ट कडून सर्व प्रकारच्या वाहनांना सांगवी फाट्याकडे येण्यास प्रवेश बंदी करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने पोल चौक येथून डावीकडे नागराज रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. २. पिंपळे निलख कडुन येणारी सर्व प्रकारची वाहने हि रक्षक चौकाकडे न येता ती विशालनगर डीपी रोडने जगताप डेअरी चौक – कस्पटे चौक मार्ग इच्छित स्थळी जातील.

३. जगताप डेअरी ब्रीज खालील चौकामध्ये कस्पटे चौकाकडुन येणारी सर्व प्रकारची वाहने हि डाव्या व उजव्या बाजुने औंध रावेत रोडला न येता ती सरळ ग्रेड सेपरेटरमधून शिवार चौक कोकणे चौकाकडुन इच्छित स्थळी जातील.

४. शिवार चौकाकडुन येणारी वाहतुक हि उजव्या डाव्या बाजुने औंध रावेत रोडला न येता ती सरळ ग्रेड सेपरेटरमधून कस्पटे चौकातुन इच्छित स्थळी जातील. ५. तापकीर चौक, एमएम चौकाकडुन काळेवाडी फाटा ब्रीज कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने हि रहाटणी फाटा चौकातून रहाटणी गाव गोडांबे चौकाकडून इच्छित स्थळी जातील.

६. सांगवी गावातून सांगवी फाट्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहने हि शितोळे पंप जुनी सांगवी व वसंतदादा पुतळा चौक जुनी सांगवी दापोडी मार्गे इच्छितस्थळी जातील.

वाकड वाहतूक विभाग

७. ताथवडे गांव चौकाकडून डांगे चौकाकडे येणारी वाहने ताथवडे चौकामधून उजवीकडे वळून ताथवडे अंडरपास किंवा परत हॅगिंग ब्रिज मागें इच्छित स्थळी जातील.

८. काळाखडक येथून डांगे चौकाकडे जाणारी वाहने काळाखडक येथून यु टर्न घेवून भुमकर चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

९. वाकड दत्तमंदिर रोडने डांगे चौकाकडे येणारी वाहने अण्णाभाऊ साठे चौकातून उजवीकडे किंवा डावीकडे वळून इच्छित स्थळी जातील.

१०. छत्रपती चौक कस्पटे वस्ती येथून काळेवाडी फाट्याकडे येणारी वाहने छत्रपती चौक येथून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.

११. बारणे कॉर्नर थेरगाव येथून थेरगांव फाट्याकडे येणारी वाहणे उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील किंवा यु टर्न घेवून तापकिर चौकाकडे जातील.

१२. थेरगाव कडून बिर्ला हॉस्पीटल चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहने राघवेंद्र महाराज मठ येथून इच्छित स्थळी जातील किंवा बारणे कॉर्नर थेरगाव मार्गे इच्छित स्थळी जातील.

१३. कावेरीनगर पोलीस वसाहतीकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कावेरीनगर अंडरपासकडे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात येत असून सदरची वाहने हि वाकड भाजीमंडई समोरील कॉर्नर येथून डावीकडे वाकड पोलीस स्टेशनकडील रस्त्याने दत्त मंदिर रोडने इच्छित स्थळी जातील.

चिंचवड वाहतूक विभाग

१४. दळवीनगर चौकाकडून खंडोबामाळ व चिंचवड स्टेशन कडे जाणारा रोड सर्व वाहनासाठी बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने ही बिजलीनगर चौक मार्गाने इच्छीतस्थळी जातील.

१५. रिव्हर व्युव चौकातुन डांगे चौक तसेच डांगे चौकाकडून महावीर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने चिंचवडे फार्म मार्गाने वाल्हेकरवाडी रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच भोसरी कडे जाणारी वाहने बिजलीनगर वाल्हेकरवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.

१६. चिंचवडे नगर टी जंक्शनकडे रिव्हर व्हुव कडुन जाणारी वाहने सरळ रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील.

१७. लोकमान्य हॉस्पीटल चौक, चिंचवड समोरील रोडवरून महाविर चौक चिंचवड कडे जाणरा रोड सर्व वाहनांसाठी बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने ही लोकमान्य हॉस्पीटल चौकापासुन डावीकडे वळून दळवीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

१८. एस.के.एफ. चौक चिंचवड मार्गाने खंडोबा माळ चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने ही बिजलीनगर चौक मार्गाने इच्छित स्थळी जातील.

१९. लिंकरोड पिंपरी कडून येणारी वाहने हि चाफेकर चौकात न येता ती मोराया हॉस्पीटल चौक केशवनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

२०. महाविर चौक व शिवाजी चौकात येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने हि मोहनगर चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

२१. बिजलीनगर चौकाकडून त्रिवेणी हॉस्पीटल चौकाकडून रिव्हर व्हयुव चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहतूक हि रावेत मागें इच्छित स्थळी जातील.

२२. मुकाई चौकाकडून चिंचवडकडे येणारी वाहतूक त्रिवेणी हॉस्पीटल वाल्हेकरवाडी येथे डावीकडे वळून पुढे पार्श्वनाथ चौक, भेळ चौक मार्गे पुढे काचघर चौकातून डावीकडे वळून पुढे यु टर्न घेवून भक्ती शक्ती चौकातील ‘भुयारी मार्गातुन अंकुश चौक, त्रिवेणीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

पिंपरी वाहतूक विभाग

२३. निरामय हॉस्पीटलकडून महावीर चौकाकडे येणारी वाहतूक सरळ व उजवीकडे न जात ती डावे बाजुकडे वळून मोरवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.

२४. परशुराम चौकाकडून खंडोबामाळ चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहतूक आर डी आगा थरमॅक्स चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.

२५. के.एस.बी चौकाकडून महावीर चौक तसेच छत्रपती शिवाजी चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने बसवेश्वर चौक येथून डावीकडे वळून अॅटो क्लटर मार्गे इच्छित स्थळी जातील.

निगडी वाहतूक विभाग

२६. थरमॅक्स चौकाकडुन येणारी वाहतुक ही आर. डी. आगा मार्गाकडुन गरवारे कपंनी कंपाऊड पर्यंत येवुन तेथील टी जॅक्शन वरुन खंडोबामाळ चौकाकडे न जाता ती डावीकडुन परशुराम चौकाकडुन मोहननगर चिचंवड मार्गे इच्छित स्थळी जातील.

२७. दळवीनगर पुलाकडुन व आकुर्डी गावठाणातुन येणारी वाहतुक खंडोबामाळ चौकाकडे न येता गणेश व्हिजन मार्गे व आकुर्डी गावठाण मार्गे इच्छित स्थळी जातील.

२८. दुर्गा चौकाकडुन येणारी वाहतुक ही टिळक चौकाकडे न येता ती थरमॅक्स चौकाकडे किंवा यमुनानगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

२९ . भेळ चौकाकडुन येणारी वाहतुक ही टिळक चौकाकडे न येता ती सावली हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जातील.

३०. अप्पुघर/रावेतकडुन येणारी वाहतुक व ट्रान्सपोर्टनगर मधुन येणारी वाहतुक ही भक्ती शक्ती ब्रिजवर न चढता ती भक्ती शक्ती सर्कलखालच्या भुयारी मार्गाने (अंडरपासमधून) अंकुश चौक, त्रिवेणीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

३१. त्रिवेणीनगर अंकुशचौकाकडुन भक्ती शक्तीकडुन देहुरोडकडे जाणारी वाहतुक भक्ती शक्ती सर्कलखालच्या भुयारी मार्गाने (अंडरपासमधून) सरळ अप्पुधर रावेत मार्गे देहुरोड मुंबईकडे जाईल.

३२. देहूरोड कडून येणारी वाहतुक भक्ती शक्ती सर्कल वरुन त्रिवेणीनगर चौकाकडे वळवतील. किंवा पुनागेट हॉटेल समोरुन भक्ती शक्ती उड्डाणपुलावरून सरळ ग्रेडसेपरेटरमधुन इच्छित स्थळी जातील.

३३. भक्ती शक्तीकडुन मुंबई कडे जाणारी वाहतुक वळवुन हँगीग ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जातील.

भोसरी वाहतूक विभाग

३४. पुणे, खडकी, दापोडी, फुगेवाडी बाजूकडून भक्ती शक्ती चोकाकडे जाणारी वाहने हि भक्ती शक्ती चौकाकडे न जाता ती वाहने नाशिक फाट्यावरुन मोशी चौक किंवा कस्पटे चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

३५. चाकण, मोशी, आळंदी बाजूकडून नाशिक फाटा मार्गे मुंबई बाजूकडे जाणारी वाहने हि पांजरपोळ जंक्शनवरुन स्पाईन रोडने त्रिवेणीनगर, भक्ती शक्ती अंडरपासमधून राचेत मागें इच्छित स्थळी जातील किंवा नाशिक फाटा कस्पटे चौक वाकड नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

देहुरोड वाहतूक विभाग

३६. तळवडे कडुन देहुकमान जुना मुंबई कडे येणारी वाहतुक पूर्ण बंद करुन देहूगाव मार्गे इच्छित स्थळी जातील.

३७. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे वरुन येणारी वाहतुक ही सोमाटणे एक्सिट, देहुरोड एक्सिट पुर्ण पणे बंद करुन बेंगलोर हायवेने इच्छित स्थळी जातील.

३८. बेंगलोर हायवेने मुंबईकडे जाणारी सर्व वाहतुक ही किवळे ब्रिज कडुन जुन्या हायवेने येण्यास पुर्णपणे बंदी करण्यात येत असुन जड अवजड व छोटी वाहने एक्स्प्रेस हायवेने इच्छित स्थळी जातील. तसेच दुचाकी वाहने किवळे पंचर मधुन- कृष्णा चौक लोढा स्किम-गहुंजे गाव मार्गे इच्छित स्थळी जातील.

३९. मुंबई कडुन पुण्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहतुक सेंट्रल चौकातुन बेंगलोर हायवेने इच्छित स्थळी जातील.

४०. मोर्चा जुन्या हायवेने जाणार असल्याने भक्ती शक्तीचौक येथे आल्यानंतर वडगाव चौकातुन पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात येत आहे.

तळेगाव वाहतूक विभाग

४१. तळेगाव चाकण रोड ५४८ – डी वरील मुंबईचे दिशेने जाणारी जड व अवजड वाहतुकीस प्रवेश बंद करुन सदर मार्गावरील वाहने महाळुंगे वाहतुक विभागातील एच.पी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

४२. तळेगाव गावठाणकडून लिंब फाट्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक सरळ व उजवीकडे न जाता ती डाव्या बाजूने इच्छित स्थळी जाईल.

४३. बेलाडोर मार्गे ए.बी.सी पेट्रोलपंप चौकात येणारी सर्व प्रकारची वाहतूक सरळ व उजवीकडे न जाता ती डाव्या बाजूने इच्छित स्थळी जाईल.

सदरील वाहतुक बदल दि.२४/०१/२०२४ रोजी पहाटे ०६ वाजल्यापासुन मोर्चा पुणे ग्रामीण हद्दीत जाईपर्यत (अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडुन) सर्व प्रकारचे वाहने वाहतुकीसाठी बंद करुन वाहतुक वळविण्यात येत असुन मोर्चा जसजसा पुढे मार्गस्थ होईल त्याप्रमाणे मोर्चाचे मागील वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. तरी वाहन चालकांनी वर नमुद केल्याप्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments