Saturday, March 22, 2025
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगे पाटील यांचा निर्धार ! सुनील कावळेंचं बलिदान वाया जाणार नाही,...

मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार ! सुनील कावळेंचं बलिदान वाया जाणार नाही, मनोज जरांगे पाटील राजगुरु नगरच्या सभेत आक्रमक

मराठा समाजातील एका बांधवाने गुरुवारी आत्महत्या केली. मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला. मराठा समाज सुनील कावळे यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच दूर करणार नाही. तसंच कुणबी जात प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार आज मनोज जरांगे पाटील यांनी राजगुरुनगरच्या सभेत केला. एवढंच नाही तर आत्तापर्यंत मराठा बांधवांनी ज्या आत्महत्या केल्या त्याला सरकार जबाबदार असल्याचंही म्हटलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“आपला एक भाऊ सुनील कावळे याने आत्महत्या केली. त्याचं मला वाईट वाटतं आहे. मात्र सुनील कावळे यांचं बलिदान वाया जाणार नाही. मराठा समाजाच्या वेदना मला सहन होत नाहीत. मी हार तुरे स्वीकारण्यसााठी नाही तर मराठ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावोगाव फिरतो आहे. मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. मराठा बांधवांनी आत्महत्या करु नये असं आवाहन मी पुन्हा एकदा करतो आहे. तसंच आत्तापर्यंत ज्या आत्महत्या झाल्या त्यांना सरकार जबाबदार आहे.” असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मराठ्यांना शांततेचच न्याय मिळवून देणार

“मराठा बांधवांचं आंदोलन शांततेत सुरु आहे. एकेकाळी मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला होता. मात्र लक्षात ठेवा शांततेच आपल्याला आरक्षण मिळणार. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही हा शब्द तुम्हाला आज या ठिकाणी मी देतो आहे.”

मराठा समाज माझा मायबाप आहे. मायबापाच्या शब्दापुढे मी जाणार नाही. आपल्या वाट्याला कष्ट आले परंतु लेकरांच्या वाट्याला हे कष्ट नकोत. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्यातला मराठा एक झाला आहे. मराठा आरक्षण समाजाने समजून घेण गरजेचं आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की पुरावे लागतात. टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने वेळ एक महिन्यांचा वेळ मागितला. सरकारला आपण चाळीस दिवसांचा वेळ दिला. आपण मुदत दिल्यानंतर हालचालीनंतर वेग आला आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments