नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना संस्थापक संभाजी भिडे यांनी काल दि. २६ जून रोजी पुणे येथे आपल्या भाषणामध्ये “१५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन नाही, जन गण मन हे राष्ट्रगीत नाही, भारतीय राष्ट्रध्वज असलेला तिरंगा झेंडा हा राष्ट्रध्वज म्हणून आम्हाला मान्य नाही” अशी वक्तव्ये करून देशाच्या स्वातंत्र्याला, देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला व समर्पणाला बदनाम केले आहे.संभाजी भिडे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून समाजामध्ये धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्याचा तीव्र शब्दात खंडन करत आहोत. अशी माहिती सामाजिक नेते मानव कांबळे यांनी दिली
हा देश संविधानाच्या आधारे चालतो, या देशाचे अखंडत्व आणि सार्वभौमत्व हे केवळ संविधाना मुळेच अभेद्य आहे, अशी आमची ठाम धारणा आहे. त्याच संविधाना बाबतीत वारंवार संभाजी भिडे आक्षेपार्ह विधाने करत असतो. महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगाव मध्ये १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीमध्ये संभाजी भिडे हा आरोपी होता, परंतु त्याला मिळणाऱ्या राजकीय पाठिंब्यामुळे या आरोपातून त्याची जाणीवपूर्वक मुक्तता करण्यात आल्याचा आमचा आरोप आहे. “१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करू नका, २६ जानेवारीला तिरंग्याला मन वंदना देऊ नका” असे भडकावू वाकाताव्य करून आता संभाजी भिडे याने सर्व मर्यादांचे उल्लंघन केलेले असून अशा राष्ट्रविरोधी वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे याच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा तातडीने दाखल करून त्याची रवानगी तुरुंगात करावी, अशी मागणी सामाजिक नेते मानव कांबळे केली आहे.