Tuesday, December 10, 2024
Homeताजी बातमीविकासाची पालखी वाहणाऱ्या अण्णा बनसोडे यांना विजयी करा - अभिनेते भाऊ कदम...

विकासाची पालखी वाहणाऱ्या अण्णा बनसोडे यांना विजयी करा – अभिनेते भाऊ कदम यांचे आवाहन

दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, रामनगर भागात बनसोडे यांची भव्य प्रचार रॅली

उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी म्हणतात की ‘आम्ही विचाराचे वारकरी वाहतो विकासाची पालखी’ त्यामुळे  विकासाची पालखी वाहण्यासाठी पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना विजयी करावे असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले.

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांची चिंचवड दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, रामनगर भागाची प्रचार फेरी “प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम” यांच्या उपस्थितीत मंगळवारी काढण्यात आली. राम मंदिरापासून रॅली सुरू झाली राम मंदिर, पंचजन्य टाटा शो रूम, दत्त नगर, शंकर नगर, बाबर वजन काटा,  विद्या नगर, परशुराम चौक नगर, राम नगर पर्यंत ही रॅली काढण्यात आली. 

  या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व महायुतीचे समन्वयक माजी महापौर योगेश बहल, माजी महापौर मंगलाताई कदम, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, तुषार हिंगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष वैशाली काळभोर, भाजपचे शहर सरचिटणीस राजू दुर्गे, सुप्रिया चांदगुडे, तेजस्विनी दुर्गे, गणेश लंगोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस संजय जगताप, ॲड. संजय दातीर पाटील, दिलीप दातीर पाटील, राहुल दातीर पाटील, रामदास पाटील, आयुष निंबाळकर, मनिष काळभोर, राजू गुणवंत, महादेव नेरलेकर, जावेद पटेल तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  यावेळी दत्तनगर चिंचवड येथे बोलताना अभिनेते भाऊ कदम म्हणाले की, एवढा मोठा जनसमुदाय अण्णा बनसोडे यांच्यासाठी जमला आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना निवडून द्यायचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी म्हणतात की, आम्ही विचाराचे वारकरी वाहतो विकासाची पालखी हे लक्षात घेता विकासाची ही पालखी वाहण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन भाऊ कदम यांनी केले. 

  भाऊ कदम पुढे म्हणाले की, राजकारणातला एक मंत्र असतो हयगय करायची नाय दिलेला शब्द पाळायचा त्यामुळे घड्याळाला मत देऊन मतदारांनी आपला शब्द पाळावा महायुती दिलेली आश्वासने निश्चितच पाळेल असा विश्वास भाऊ कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments