बसमधून प्रवास करताना लहान मुलांचा आधार घेऊन प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका सराईत महिला टोळीला गजाआड करण्यात पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाला मोठे यश आले आहे. या कारवाईत ६ महिला आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ८९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई:
एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ कडून सुरू होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळापासून ते शिक्रापूरपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ही टोळी शिरूर तालुक्यातील जातेगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महिला सहाय्यक कक्षाच्या मदतीने सापळा लावून या सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
अटकेतील आरोपी:
१) अनुराधा उर्फ पार्वती मंगेश बुद्धिनाथ (वय ३०), २) अंजली राम बुद्धिनाथ (वय २१), ३) राधा चरण वैद (वय २१), ४) कल्पना बाला वैद (वय २१), ५) श्वेता उमर वैद (वय २१), ६) जानकी अनिल वैद (वय ३०). (सर्व राहणार: जातेगाव खुर्द, शिक्रापूर; मूळ राहणार: मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर)
तपास पथकाची कामगिरी
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, म.सहा.पो.नि गोडबोले, पोउपनि सुनिल जावळे, पो.हवा बाबासाहेब गर्जे, पो.हवा सोमनाथ बो-हाडे, पो.हवा सागर सुर्यवंशी, पो.हवा मनोज साबळे, म.पो.हवा सोनवाने, पो.ना गोनटे, पो.शि स्वप्निल महाले, पो.शि शशिकांत नांगरे, पो.शि तुषार वराडे, पो.शि समिर काळे, पो.शि सुंदर थोरात, पो.शि सुधिर दांगट, पो.शि निखिल फापाळे, पो.शि राजकुमार इघारे, म.पो.शि भोर, सपोफौ माळी, पोहवा ३०६८ ननावरे, पोशि ४२४० कारके, पोशि २३२६ बगाडे, पोशि ३०८८ कोळी यांच्या पथकाने केली आहे.


