Saturday, December 9, 2023
Homeताजी बातमीमहेश लांडगे यांचा शहराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला , पिंपरी-चिंचवडचा पुढचा अध्यक्ष कोण…...

महेश लांडगे यांचा शहराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला , पिंपरी-चिंचवडचा पुढचा अध्यक्ष कोण… ?

भाजपाकडून संघटनात्मक पुर्नबांधणी करण्यात येत असून, ज्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुखांचा कार्यकाळ संपला आहे, त्यांचे राजीनामे घेण्यात येत आहेत. त्यानुसारच आता भाजपचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने पिंपरी-चिंचवड भाजपला अधिवेशनानंतर नवा शहराध्यक्ष मिळणार आहे.

पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे प्रदेश भाजपाकडून आलेल्या संघटनात्मक सूचनांनुसार, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असे खात्रीलायक वृत्त आहे. राज्यात भाजपाकडून संघटनात्मक पुर्नबांधणी करण्यात येत असून, ज्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुखांचा कार्यकाळ संपला आहे, त्यांचे राजीनामे घेतले जातायेत. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी घोषणा होईल, असं सांगितलं जातंय.

२०१७ मधील महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पराभव केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर शहराध्यक्षपदाची धुरा आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोपवण्यात आली. शहराध्यक्ष पदाचा ३ वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे आता नवीन शहराध्यक्ष कोण होणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments