Tuesday, July 16, 2024
Homeताजी बातमीमहायुतीचे युवा शिलेदार मावळच्या प्रचारात; सायंकाळी रहाटणीत मेळावा

महायुतीचे युवा शिलेदार मावळच्या प्रचारात; सायंकाळी रहाटणीत मेळावा

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचे युवा शिलेदार उतरले आहेत. आज (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता युवा पदाधिकारी मेळावा होणार आहे.

 महायुती युवा पदाधिकारी  शनिवार  20 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता विमल गार्डन बँकवेट हॉल, रहाटणी, काळेवाडी येथे होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल लोणीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. युवा नेत्यांची तोफ धडाडणार आहे.

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांच्या प्रचारासाठी महायुतीचे युवा नेते आज मेळावा घेणार आहेत.  तरी या मेळाव्यास महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments