Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीशक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी केला अर्ज दाखल

शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी केला अर्ज दाखल

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी मंगळवारी (ता. २९) जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी खासदार अमोल कोल्हे, अखिल भारतीय काँग्रेस कमीटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, सुनिल गव्हाणे, माजी नगरसेवक नवनाथ जगताप, मच्छिन्द्र तापकीर, संपत पवार, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष इम्रान शेख, यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाचे दर्शन घेऊन रॅलीचा प्रारंभ झाला. सुवासिनींनी औक्षण केले. फटाक्यांची आतषबाजी, फुलांची पुष्पवृष्टी, ढोल ताशांच्या गजरात पदयात्रा काढली.

वाकड चौक, दत्त मंदिर रोड, पिंक सिटी, छत्रपती चौक, काळेवाडी फाटा, रहाटणी फाटा, तापकीर चौक, केशवनगर, चिंचवडगाव, थेरगाव फाटा, थेरगाव गावठाण या मार्गाने जाणाऱ्या रॅलीवर जागोजागी पुष्पवृष्टी करत व जेसीबीतून पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. अर्ज दाखल केल्यानंतर पदयात्रेत सहभागी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चिंचवड विधानसभेतील नागरिकांचे आभार मानताना कलाटे म्हणाले, ” चिंचवडला पुढच्या ५० वर्षांचा विचार करून विकास करणारा आमदार हवा आहे. चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आघाडीच्या सर्व घटक पक्षातील सहकाऱ्यांशी मी संवाद साधणार आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments