Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमी'डिजिटल मिडिया'च्या रोल माॅडेलसाठी महाराष्ट्राने पुढं यावे - ज्येष्ठ पत्रकार राजा माने

‘डिजिटल मिडिया’च्या रोल माॅडेलसाठी महाराष्ट्राने पुढं यावे – ज्येष्ठ पत्रकार राजा माने

‘डिजिटल मिडिया’ संपादक पत्रकार संघटनेची पिंपरी-चिंचवड कार्यकारिणी जाहीर

भविष्यकाळ हा ‘डिजिटल मिडिया’चा राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘डिजिटल मिडिया’च्या पत्रकारांना कायदेशीर हक्क, अधिस्विकृती मिळवून देणार आहे. याकरिता आपण महाराष्ट्र सरकारला स्वतंत्र धोरण तयार करुन दिलं आहे. देशात महाराष्ट्र सरकारने डिजिटल मिडियाचं रोल माॅडेल म्हणून पुढं यावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार राजा माने केले.

काळेवाडी येथील डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश कुगावकर, शामल खैरनार, केतन महामुनी, अतुल दिक्षित, अमोल पाटील, अजिंक्य स्वामी, विकास शिंदे, गणेश हुंबे, मंगेश सोनटक्के आदी उपस्थित होते.

माने पुढे म्हणाले की, देशातच नव्हे जगात ‘डिजिटल मिडिया चा भविष्यकाळ राहणार आहे. यापुढे सर्वांनी मल्टीमिडिया राहून वृत्तपत्र, साप्ताहिक वेबपोर्टल, युट्यूब सर्वच क्षेत्रात सक्रीय राहणारे हिरो ठरणार आहेत. डिजिटल क्षेत्रात कितीही क्रांती झाली, तरी ग्रामीण भागात संघटन न झाल्यास हे क्षेत्र भरकटणार आहे. म्हणून डिजिटल मिडियाचं संघटन करण्यास सुरुवात केली. आगामी काळात सर्वाधिक क्षेत्र म्हणून डिजिटल मिडिया पुढं येताना दिसत आहे.

‘चांदा ते बांधा’ अशी आपल्या संघटनेची बांधणी सुरु आहे, आपण कोणाशीही स्पर्धा करीत नाही. परंतू, आपली वाटचाल, दिशा ठरलेली आहे. आपल्याला देशात, महाराष्ट्रात डिजिटल मिडियाला कायदेशीर स्वरुप देण्याचा प्रयत्न राहणार आहे. संघटनात्मक ताकद वाढवली तर डिजिटल मिडियाला ग्रामीण भागासह महानगरात बळकटीकरण मिळेल, याकरिता संघटना काम करेल.

कॉर्पोरेट कंपन्या आणि अॅड्स कंपन्यांना देखील भविष्यात प्रिंट, इलेक्ट्राॅनिक मिडिया हाऊसला जाहिरात देताना ‘डिजिटल मिडिया’चा देखील विचार करावा लागेल. डिजिटल मिडियाला आर्थिक स्तर मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी रिसर्च बेससाठी स्वतंत्र अॅप डेव्हल करुन अर्थकारण ठरविणार आहे. राजकीय पक्षाच्या माध्यमातून देखील जाहिरात देताना प्रत्येकाचा रिच आणि फाॅलोवर्स पाहून गावपातळी ते महानगरातील प्रत्येक डिजिटल मिडियाला गुणात्मक पध्दतीने जाहिरात देण्याचे धोरणाची आखणी करण्यात येईल.

भविष्यात डिजिटल मिडिया संपादक संघटनेने आखलेली ध्येय-धोरणे आर्दश ठरतील, गाव ते महानगरातील डिजिटल मिडियाचे पत्रकारांना कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी अधिस्विकृती प्रमाणे शासनस्तरावर ओळखपत्र देण्यात येईल. याकरिता पत्रकार दिनानिमित्त सातारा जिल्ह्यात डिजिटल मिडियाचे ओळखपत्र देण्यास सुरुवात होईल. यापुढे सर्व जिल्ह्यातील डिजिटल मिडियाच्या पत्रकारांना कार्ड देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

डिजिटल मिडियाच्या अधिकृत नोंदणीसाठी आपली संघटना काम करेल. त्यामुळे आपली संघटना कुटूंब म्हणून काम करेल. असेही माने यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश हुंबे यांनी केले. तर विकास शिंदे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments