Monday, December 4, 2023
Homeताजी बातमीमहाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे वाङ्‍‍मय पुरस्कार जाहीर…

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे वाङ्‍‍मय पुरस्कार जाहीर…

कादंबरी, ललित, कथा कविता आणि बालसाहित्य या पाच साहित्य विभागातील पुरस्कारासाठी महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या पुस्तकांमधून परिक्षकांनी दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक विभागातील ” उत्कृष्ट वाङ्‍‍मय पुरस्कार” व ” लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कार ” महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड तर्फे जाहीर करण्यात आले आहेत.

कादंबरी विभाग-

पांडुरंग जोशी स्मृती उत्कृष्ट वाङ्‍‍मय पुरस्कार व नाना दामले स्मृती लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कार, डॉ स्मिता दातार मुंबई यांच्या ‘ फक्त “ती” च्या साठी’ तर शीतल देशमुख डहाके यवतमाळ यांच्या “व्हेन माय फादर” या कादंबरींची अनुक्रमे उत्कृष्ट व लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

ललित विभाग-
रविंद्र पाटील पुरस्कृत ललित वाङ्‍‍मय पुरस्कार, धनश्री लेले ठाणे यांच्या ” अलगद ” तर नंदकुमार मुरडे पुणे यांच्या “दस्तऐवज शब्दांचा” या पुस्तकांची अनुक्रमे उत्कृष्ट व लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

कथा विभाग –
अशोक इनामदार स्मृती वाङ्‍‍मय पुरस्कार ,दत्तात्रय सैतवडेकर मुंबई यांच्या ” ब्रेकींग न्यूज़ ” तर रमेश पिंजरकर पुणे यांच्या ” अरण्य-रुदन ” या कथासंग्रहांची अनुक्रमे उत्कृष्ट व लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

कविता विभाग-
अपर्णा मोहिले स्मृती वाङ्‍‍मय पुरस्कार, शशिकांत हिंगोणेकर, जळगाव यांच्या ” युद्धरत” तर विलास गावडे पनवेल यांच्या ” देशाचं महानिर्वाण” या काव्यसंग्रहांची अनुक्रमे उत्कृष्ट व लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

बालसाहित्य विभाग-
दि. बा. कुलकर्णी स्मृती उत्कृष्ट वाङ्‍‍मय व संभाजी बारणे पुरस्कृत लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कार, विनोद पंचभाई पुणे यांच्या “हे खरे जगज्जेते” या चरित्रात्मक पुस्तकाची व मुरहारी कराड लातूर यांच्या ” नव्या जगाची मुले” या काव्यसंग्रहांची विभागून तर रमेश वंसकर गोवा यांच्या “आइस्क्रीमचं तळं ” या काव्यसंग्रहाची अनुक्रमे उत्कृष्ट व लक्षवेधी ववाङ्‍‍मय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

सदर वाङ्‍‍मय पुरस्काराचा समारंभ शुक्रवार दिनांक २८ एप्रिल रोजी होणार असून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून प्रसिद्ध निवेदक लेखक सुधीर गाडगीळ आणि मसाप पुणे चे उपाध्यक्ष राजीव बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांनी सांगीतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments