६ जानेवारी २०२०,
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या ६३ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात कोल्हापूर जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळाले. ७४ किलो माती विभागात पैलवान अनिल चव्हाण याने सोलापूरच्या आबासाहेब मदने याला १०-६ गुणांनी हरवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तत्पूर्वी उपांत्य फेरीत अनिलने कोल्हापूर जिल्हाच्याच प्रवीण पाटील यास चितपट केले होते. २०१७ साली भुगाव मुक्कामी झालेल्या अधिवेशन मध्ये अनिल चव्हाण याने ७० किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले होते. गेली दोन वर्षापासून जायबंदी असल्यामुळे अनेक दिवस तो कुस्ती खेळापासून दूर होता. पण महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे धडाक्यात पुनरागमन करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. याच गटात सगळीचा श्रीकांत निकम कांस्य पदकाचा मानकरी ठरला.
७४ किलो माती अंतिम निकाल.
सुवर्ण- अनिल चव्हाण (कोल्हापूर)
रौप्य- आबासाहेब मदने (सोलापूर)
कांस्य- श्रीकांत निकम (सांगली)