Tuesday, February 27, 2024
Homeताजी बातमी'महाराष्ट्र बंद हा सरकार पुरस्कृत दहशतवादच'; फडणवीस यांचा निशाणा

‘महाराष्ट्र बंद हा सरकार पुरस्कृत दहशतवादच’; फडणवीस यांचा निशाणा

११ ऑक्टोबर २०२१,
महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. फडणवीस यांनी आघाडीच्या या बंदला ‘ढोंगीपणाचा कळस’ असे संबोधले आहे. या बंदद्वारे सरकारचा ढोंगीपणा उघड झाला असून आजचा बंद हा सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर या सरकारने आज संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावे, अन्यथा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल, असे आवाहनही फडणवीस यांनी सरकारला केले आहे.

देवेंद्र फडणवीस मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड झाला असून हे सरकारच पूर्णपणे ढोंगी आहे. लखीमपूरच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रात बंद केला जातो. पण दुसरीकडे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मात्र हे सरकार एकही पैसा द्यायला तयार नाही. आज राज्यातील शेतकरी संकटात आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आतापर्यंत तब्बल दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन २५ हजाराच्या आणि ५० हजाराच्या ज्या काही घोषणा केल्या त्या सर्व घोषणा हवेतच विरलेल्या आहेत. अनेक संकटांमध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही आणि जरी केली असेल तरी ते अपुरी मदत आहे. यामुळे भाजपचेच सरकार बरे होते असे म्हटले जात असल्याचे फडणवीस म्हणाले.

‘या सरकारचे नाव ‘बंद सरकार”
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून योजना, अनुदाने बंद करू लागले आहे. यांनी कोरोना संकटकाळात महाराष्ट्र बंद केला. आता कुठे छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांचं गाडं रुळावर येत असताना सरकारने बंद पुकारला म्हणून या सरकारचे नावच बंद सरकार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments