महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतोय. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. आज महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होईल.
मतमोजणी म्हणजे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होईल.
राजीव कुमार यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
आम्ही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्या दौऱ्यादरम्यान आम्ही निवडणुकीची तयारी योग्य प्रकारे झाली आहे की नाही? याची माहिती आम्ही घेतली. लोकसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election ) वेळी काही गोष्टी घडल्या होत्या त्या टाळण्यासाठी आम्ही आता पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. लोकांची मतदानासाठी रांग लागते त्यावेळी काही अंतरावर खुर्ची किंवा बाक रचण्याचा सल्ला आम्ही दिला आहे. ८५ वर्षे आणि त्यावरच्या मतदारांना घरुन मतदान करता येणार आहे. तसंच या मतदारांच्या गोपनीयतेची काळजी आम्ही घेऊ त्यासंदर्भातली पूर्ण व्यवस्था आम्ही केली आहे असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.
अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकाल या दोन्हीची तारीख जाहीर झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात निवडणूक कधी जाहीर होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतल २६ नोव्हेंबरच्या आधी निवडणूक घेतली जाईल असं म्हटलं होतं. आज अखेर या निवडणुकीची आणि निकालाच्या दिवसाची घोषणा झाली आहे.