मुंबई, ता.5: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीच्या आरोपांमुळे त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून राजीनामा देण्यास दबाव वाढत होता. यातच मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयात दाखल याचिकांवर निर्णय देताना अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळेच चौकशी होत असणाऱ्या मंत्रीपदावरील व्यक्तीने मंत्रीपदावर राहणे योग्य दिसणार नाही, यामुळेच देशमुख आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे देणार आहेत, असे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन यांसदर्भातील चर्चा केली. यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचे ठरवले असून ते मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणार आहेत.