६ जानेवारी२०२०,
आज सकाळच्या सत्रात गुलाबी थंडीत अनेक काटा व चित्तथरारक लढती शिवछत्रपती क्रीडा नगरीत पाहायला मिळणार आहेत. ‘महाराष्ट्र केसरी’ खुला (ओपन) गटातील मल्लाच्या माती व गादी विभागातील तीन लढती झाल्या असून आज सकाळच्या सत्रात चौथ्या फेरीना सुरुवात होईल. सर्व मल्ल जसे महाराष्ट्र केसरी गदेकडे एक पाऊल पुढे टाकतील तशा प्रत्येक कुस्ती शौकीन, कुस्ती प्रेमींच्या नजरा लढतील प्रत्येक हालचालीवर खिळलेल्या असणार आहेत.
राज्यच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च मानाची गदा आता फक्त दोन पाऊलावर असलेली असल्यामुळे चौथ्या फेरीत सर्व मल्ल आपले सर्वस्व पणाला लावून जोशाने लढताना दिसतील.
■ गादी (मॅट) विभाग चौथी फेरी
१) पैलवान सचिन येलभर- (मुंबई उपनगर) ❌ पैलवान प्रविण सरक- (सातारा)
२) पैलवान हर्षवर्धन सदगिर (नाशिक जिल्हा) ❌ पैलवान संग्राम पाटील (कोल्हापूर )
३) पैलवान आदर्श गुंड (पुणे जिल्हा ) ❌ पैलवान सागर बिराजदार (लातूर)
४) पैलवान अभिजित कटके (पुणे शहर) ❌ पैलवान अक्षय मंगवडे (सोलापूर)
■ माती विभाग चौथी फेरी
१) पैलवान संतोष दोरवड (रत्नागिरी ) ❌ पैलवान शैलेश शेळके (लातुर )
२) पैलवान गणेश जगताप (हिंगोली) ❌ पैलवान सिकंदर शेख (वाशीम)
३) पैलवान बाला रफीक शेख (बुलढाणा) ❌ पैलवान तानाजी झुंजूरके (पुणे शहर )
४) पैलवान संदिप काळे (मुं. पूर्व ) ❌ पैलवान ज्ञानेश्वर उर्फ माउली जमदाडे (सोलापुर )