17 November 2020.
मध्यप्रदेशातलं भाजप सरकार लवकरच आंतर्धर्मीय विवाहांविषयी कायदा आणणार आहे, ज्याअंतर्गत दोषी आढळल्यास पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही याआधी सांगितलं होतं, की त्यांचं सरकार असा कायदा आणणार आहे.
मंगळवारी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सरकारच्या निर्णयाविषयीची माहिती देताना म्हटलं की, “मध्य प्रदेश सरकार ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावर धर्म स्वातंत्र्य कायदा आणेल.
विधानसभेच्या आगामी अधिवेशनात त्यासाठी विधेयक मांडलं जाईल. कायदा आणल्यावर अजामीनपात्र कलमांअंतर्गत खटला दाखल केला जाईल आणि पाच वर्षांची कठोर शिक्षा दिली जाईल.”