Friday, June 13, 2025
Homeराजकारण" पंचक " मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी उद्या माधुरी दीक्षित पिंपरी चिंचवडमध्ये

” पंचक ” मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी उद्या माधुरी दीक्षित पिंपरी चिंचवडमध्ये

आपला आवाज आपली सखीकडून जंगी स्वागत

आपला आवाज आपली सखी च्या वतीने देशातील प्रसिद्ध अभिनेत्री तथा धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांनी निर्मित केलेला पंचक या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो शुक्रवारी (दि.5) सकाळी 10 वाजता चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल चिंचवड येथे आयोजित केला आहे. यानिमित्त धकधक गर्ल माधुरी दीक्षित पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच येत असल्याने आपला आवाज आपली सखीच्या महिला सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांनी गुरूवारी (दि.4) पत्रकार परिषदेत सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी एम्प्रो मॉलमधील मल्टिफ्लेक्समधील पंचक चित्रपटाचे सर्व शो आगाऊ बुक करण्यात आले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज गाजविणारी मराठी मुलगी माधुरी दीक्षित हिच्यासोबत भेट होणार म्हणून आपला आवाज आपली सखीच्या महिला सदस्यांमध्ये आगळाचा उत्साह संचारला आहे. त्या प्रसंगी पंचक चित्रपटामधील सर्व कलाकार तसेच, संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

मराठी चित्रपट क्षेत्रात प्रत्येक मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याच्या प्रचार व प्रसारासाठी पिंपरी-चिंचवड शहराचीही निवड केली जात नव्हती. मात्र, आपला आवाज आपली सखीचा दांडगा प्रतिसाद आणि उत्साह लक्षात घेऊन आता पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीलाही प्राधान्य दिले जात आहे. फस्ट डे फस्ट शो आता पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आपला चित्रपट रिलीज करण्यासाठी शहरात येत आहे, हे त्याचेच उदाहरण आहे. ही शहरवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संगीता तरडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments