Saturday, March 22, 2025
Homeअर्थविश्वपुन्हा एलपीजी सिलिंडर महागला ; सलग दुसऱ्या महिन्यात मोठी दरवाढ..!

पुन्हा एलपीजी सिलिंडर महागला ; सलग दुसऱ्या महिन्यात मोठी दरवाढ..!

जागतिक बाजारात इंधन दरात झालेल्या प्रचंड वाढीचा फटका बसलेल्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. वाणिज्य वापरातील १९ किलोच्या एलपीजीच्या किमतीत १०० रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीने सलग दुसऱ्या महिन्यात छोट्या व्यावसायिकांना दणका दिला आहे. तर घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केला नाही.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला. गेल्याच महिन्यात वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत तब्बल २६६ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज आणखी १०० रुपयांनी सिलिंडर महागला आहे.आजच्या दरवाढीनंतर मुंबईत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचा भाव २०५१ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत १९ किलोचा सिलिंडर आजपासून २१०१ रुपये झाला आहे. तर चेन्नईत २२३४ असा विक्रमी दर १९ किलो सिलिंडरसाठी झाला आहे. कोलकात्यात १९ किलो सिलींडरसाठी २१७७ रुपये दर असेल.

दरम्यान, आज वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असली तर घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलिंडरच्या किमती जैसे थे आहेत. यामुळे देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. मुंबईत विनाअनुदानित घरगुती गॅसचा दर ८९९.५ रुपये आहे. दिल्लीत तो ८९९.५ रुपये आहे. चेन्नईत ९१५.५ रुपये असून कोलकात्यात तो ९२६ रुपये आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments