Sunday, June 15, 2025
Homeआरोग्यविषयकवैद्यकीय कचरा उघडयावर टाकल्यामुळे लोटस हॉस्पिटला २५ हजार रुपयांचा दंड..

वैद्यकीय कचरा उघडयावर टाकल्यामुळे लोटस हॉस्पिटला २५ हजार रुपयांचा दंड..

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या तपासणीत कुदळवाडी चिखली येथे उघडयावर वैद्यकीय कचरा आढळून आल्याने सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या पथकाने २५ हजार रुपयांचा दंडाची कारवाई लोटस हॉस्पिटल वर आज दुपारी केली. आज चिखली परिसरात स्वच्छता विषयक पाहणी करताना रुग्णालयाचा कचरा रस्त्यावर पडलेला आढळून आला.

त्यामधील केस पेपर वरून आरोग्य निरिक्षक वैभव कांचनगौडार व अमर सुर्यवंशी यांनी तपासणी केली असता लोटस हॉस्पिटल चे असल्याचे दिसून आले.त्यानंतर सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे व आरोग्य निरीक्षक वैभव कांचन गौडार यांनी डॉक्टर लाडे यांच्या बरोबर चर्चा केली व यापुढे वैद्यकीय कचरा योग्य पध्दतीने हाताळण्या बाबत सूचना दिल्या. वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी असे आवाहन करण्यात येत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments