Tuesday, April 22, 2025
Homeगुन्हेगारीट्रकमध्ये दोन कंपार्टमेंट बनवून अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर लोणावळा पोलिसांकडून कारवाई…

ट्रकमध्ये दोन कंपार्टमेंट बनवून अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर लोणावळा पोलिसांकडून कारवाई…

पुष्पा चित्रपट आपण सर्वांनी पाहिला असेल, त्या चित्रपटातील नायक जसा चोरी करण्याससाठी ट्रकमध्ये दोन कंपार्टमेंट बनवून चोरीचा माल विकत असे, तसाच प्रकार प्रत्यक्षात समोर आला आहे. ट्रकमध्ये दोन कंपार्टमेंट बनवून अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना उत्पादन शुल्क विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींनी ट्रकच्या पुढच्या भागात दारू साठा आणि मागच्या बाजूस पोलिसांना चकवा देण्यासाठी प्लास्टिक ठेवले होते. मात्र, पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

पुणे – बंगरुळू महामार्गावरील वळवण इथे ही कारवाई करण्यात आली. यात ६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रकचालक बाबुलाल गेवरचंद मेवाडा (५२), क्लिनर संपतलाल भवरलाल मेवाडा (३०, दोघे. रा, भिलवाडा, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा राज्यात तयार होत असलेल्या या दारूला राज्यात विक्रीसाठी बंदी आहे. ट्रकमधून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पुणे उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी लोणावळा शहराजवळ असलेल्या वळवण गावाजवळ सापळा रचून ही कारवाई केली आहे. ट्रकची तपासणी करत असताना सुरुवातीला पोलिसांना गाडीत ट्रक असल्याचे निदर्शनास आले. मात्र, ट्रकला दोन कंपार्टमेंट बनवल्याची शंका पोलिसांना आली. त्यानुसार अधिक तपास केला असता, ट्रकला दोन कंपार्टमेंट बनवल्याचे समोर आले. त्यात दारूसाठा ठेवल्याचे समोर आले. त्यानुसार शुल्क विभागाने ट्रक चालक आणि वाचकाला ताब्यात घेतले आहे.

ट्रकमधून पथकाने रॉयल चॅलेंज प्रिमीयम ७५० मिली क्षमतेच्या ४८ बॉक्स, व्हिस्कीचे ४४७ बॉक्स, टुबर्ग ४२ बॉक्स असे जवळपास पाच हजारांहून अधिक बाटल्या आणि इतर मुद्देमाल असा ५९ लाख ९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments