Sunday, May 17, 2026
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवडमध्ये ‘नारी शक्ती वंदन विधेयका’वरून राजकीय वातावरण तापले; सर्वसाधारण सभा ५ मेपर्यंत...

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘नारी शक्ती वंदन विधेयका’वरून राजकीय वातावरण तापले; सर्वसाधारण सभा ५ मेपर्यंत तहकूब

संसदेत ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज तीव्र राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. सत्तारूढ भाजपकडून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या भूमिकेचा जोरदार निषेध करण्यात आला.

सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी या मुद्द्यावर तीव्र भूमिका घेत, निषेधार्थ महापालिकेची सर्वसाधारण सभा ५ मे २०२६ पर्यंत तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला, जो मंजूर करण्यात आला.

सभागृहात प्रवेश करताना भाजपच्या महिला नगरसेविकांनी काळ्या साड्या परिधान करून निषेध नोंदवला, तर इतर सदस्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलनात सहभाग घेतला. “नारी शक्तीचा अपमान सहन करणार नाही” अशा घोषणांनी सभागृहात वातावरण ढवळून निघाले.

यावेळी महिला नगरसेविकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे हे विधेयक नामंजूर होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. “महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण असलेले हे विधेयक फेटाळल्यामुळे देशातील महिलांच्या हक्कांवर गदा आली आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्यांना महिला कदापि माफ करणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला.

सभा तहकूब झाल्यानंतर महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर भाजपच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात पुन्हा एकदा महिला आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला असून, आगामी काळात या विषयावर आणखी राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments