Tuesday, January 13, 2026
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवडमधील शिवसेना (ठाकरे गट) शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचा आज भाजपात प्रवेश...

पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना (ठाकरे गट) शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचा आज भाजपात प्रवेश होणार 

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नुकताच शिवसेना शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर, आज (दि. २०) मुंबई येथे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. त्यासाठी ते पिंपरी गाव येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

संजोग वाघेरे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली होती. अखेर आज त्यांच्या प्रवेशाने त्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात असून, शहरातील राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर पद भूषवले आहे. याशिवाय त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच नंतर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) शहराध्यक्ष अशी जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. गेल्या वर्षी मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना लक्षणीय मते मिळाली होती.

वाघेरे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे, तर शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments