Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभा 2024- शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

लोकसभा 2024- शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अखेर आज आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये 17 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही यादी ट्विटरवर पोस्ट केली आहे.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.. ….मुंबई दक्षिण मध्य: श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. इतर 16 उमेदवार पुढील प्रमाणे बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ, वाशिम संजय देशमुख, मावळ संजोग वाघेरे, सांगली चंद्रहार पाटील, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे, धाराशिव ओमराजे निंबाळकर, शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक राजाभाऊ वाजे, रायगड अनंत गिते, सिंधुदुर्ग, रत्नागिरी विनायक राऊत, ठाणे राजन विचारे, मुंबई ईशान्य संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, मुंबई वायव्य अमोल किर्तीकर, परभणी संजय जाधव’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अद्यापही चार ते पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागांवरील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांच्यावतीने मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments