२६ डिसेंबर
‘ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागलं आहे, त्याचप्रमाणे देशालाही ग्रहण लागलं आहे. हे ग्रहण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचं आहे,’ अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नागरिकत्व सुधारणाकायदा व एनआरसीच्या अंमलबजावणीविरोधात आंबेडकर यांच्या पक्षानं आज धरणं आंदोलन आयोजित केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकार जोरदार टीका केली. ‘देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारनं सीएए व एनआरसी हे मुद्दे उकरून काढले आहेत. त्यांचा फटका केवळ मुस्लिमांना नव्हे तर देशातील हिंदूंनाही बसणार आहे. तब्बल ४० टक्के हिंदू या कायद्यामुळं बाधित होणार आहेत,’ असं ते म्हणाले.