Friday, June 13, 2025
Homeउद्योगजगतपुणे म्हाडाच्या २९०८ घरांसाठी आज सोडत

पुणे म्हाडाच्या २९०८ घरांसाठी आज सोडत

२ जूलै २०२१
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्य़ातील २९०८ घरांसाठी जाहीर करण्यात आलेली सोडत शुक्रवारी (२ जुलै) जाहीर होणार आहे. यामध्ये म्हाडाच्या योजनेतील २१५३ सदनिका व २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत ७५५ सदनिका उपलब्ध होणार आहेत. ही सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाहीर के ली जाणार आहे.

चालू वर्षी जानेवारी महिन्यात काढलेल्या सोडतीला उस्फू र्त प्रतिसाद मिळाला होता. या पाश्र्वभूमीवर ही सोडत काढण्यात येणार आहे. सदनिकांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत १३ मेपर्यंत देण्यात आली होती. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिकांच्या आग्रहास्तव या सोडतीसाठी अर्ज करण्यास एक महिन्याची (१३ जून) मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार २९०८ घरांसाठी तब्बल ५७ हजार नागरिकांनी घरांसाठी अर्ज के ले आहेत. करोना काळातही सहा महिन्यांत दोन वेळा आणि दोन हजारांपेक्षा अधिक घरांसाठी सोडत काढण्यात आली होती, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.

दरम्यान, या सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०९ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेच्या १६, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुण्यात ३००, तर पिंपरी-चिंचवड शहरात ४५५ अशा एकू ण ७५५ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य) १४९६ अशा एकू ण २९०८ सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही माने पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments