३० डिसेंबर २०२०,
दिल्लीत शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी सैनिक व पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर हे वयाच्या 80 व्या वर्षी शुक्रवारी (दि. 1 जानेवारी 2021) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. त्यांच्या बरोबर पोस्टातील निवृत्त कर्मचारी ज्येष्ठ नागरीक विश्वनाथ खंडाळे (वय 75 वर्ष) हे देखील उपोषणात सहभाग घेणार आहेत. सैन्यात आण्णा हजारे यांच्या बरोबरच सेवा बजावणारे रुपनर हे शुक्रवारी 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात लाक्षणिक उपोषण करणार आहेत. बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपोषण स्थळी उपस्थित रहावे असे आवाहन रुपनर यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या निषेधार्थ वयाच्या 80 व्या वर्षी लक्ष्मण रुपनर करणार उपोषण
RELATED ARTICLES