Monday, June 15, 2026
Homeगुन्हेगारीपिंपरी चिंचवड शहरातील कायदा सुव्यवस्था चिंताजनक- सचिन साठे

पिंपरी चिंचवड शहरातील कायदा सुव्यवस्था चिंताजनक- सचिन साठे

पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी स्थापन करण्यात आले. यानंतर शहरातील गुन्हेगारीवर पोलीसांचे कडक नियंत्रण राहणे हि सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती. ती फोल ठरत आहे. अश्या अनेक घटना मागील आठ दहा महिन्यात घडल्या आहेत. मागील दहा दिवसात गोळीबाराच्या दोन घटनेत दोन युवकांचा खुन झाला आहे. अशा खुनांच्या व महिला अत्याचारांच्या घटनेत लक्षणिय वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था चिंताजनक आहे. यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुन्हेगार व गुन्हेगारी क्षेत्रावर वचक बसविण्यासाठी तातडीने कडक धोरण अवलंबवावे असे पत्र सचिन साठे यांनी पिंपरी पोलीस आयुक्तालयात दिले.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-या युवकांकडून वाहनांच्या तोडफोडीच्या 50 हुन जास्त घटना मागील आठ महिन्यात घडल्या आहेत. यामध्ये अल्पवयीन व नविन गुन्हेगारांचा समावेश आहे. अनेक अल्पवयीन आणि तरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षण म्हणून ओढले जात आहेत. शहरातील संघटीत गुन्हेगारी व माथाडी क्षेत्रातील दहशत यामुळे सर्व सामान्य नागरीकांसह उद्योजक, व्यापारी दहशतीच्या छायेत आहेत. हे गुन्हेगारी क्षेत्रावर व कायदा सुव्यस्थेवर पोलीसांचे नियंत्रण कमी झाल्याचे लक्षण आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सार्वत्रिक निवडणूका होणे अपेक्षित आहे. या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढती गुन्हेगारी हि चिंताजनक बाब आहे. गुन्हेगारीवर पुर्ण नियंत्रण मिळविणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कर्तव्य आहे. येथील महिला, युवतींना, उद्योजक, व्यापा-यांना, सर्वसामान्य नागरीकांना भयमुक्त वातावरण मिळाले पाहिजे हा या शहरातील नागरीकांचा हक्क आहे. मा. महोदय, आपण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे प्रमुख या नात्याने गुन्हेगार व गुन्हेगारी क्षेत्रावर वचक बसविण्यासाठी आपण तातडीने कडक धोरण अवलंबवावे असेही या पत्रात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments