पिंपरी- चिंचवडमध्ये शरद पवार गट अधिक जोमाने कामाला लागल्याचं दिसत आहे. शरद पवार गटात सध्या इनकमिंग सुरू आहे. स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचे पीए सतीश दत्तात्रेय कांबळे यांनी शरद पवार गटात रोहित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यांनी आठ वर्ष लक्ष्मण जगताप यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले. पुण्यामध्ये कांबळे यांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि तुषार कामठे यांच्यासह रोहित पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला. पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गट जोमाने कामाला लागला आहे. शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपाचे एकनिष्ठ आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांचे पीए सतीश कांबळे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे शरद पवार गटाची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. कांबळे हे सलग आठ वर्ष जगताप यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलेले आहे. जगताप यांची राजकीय कारकीर्द त्यांनी जवळून पाहिल्याने त्याचा फायदा शरद पवार गटाला होऊ शकतो. शरद पवार गटात प्रवेश करताच त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर समन्वयक पदाची जबाबदारी दिली असून याबाबतचे नियुक्तीपत्र नेते रोहित पवार यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. कांबळे हे आगामी निवडणुकीच्या काळात शरद पवार गटासाठी महत्त्वाचे ठरतील असा विश्वास शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी व्यक्त केला आहे.