Saturday, March 2, 2024
Homeउद्योगजगतउद्योगपती राहुल बजाज यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्योगपती राहुल बजाज यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

प्रसिद्ध उद्योगपती आणि बजाज उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा राहुलजी बजाज यांना रविवारी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये बजाज यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा आपला भाग्यविधाता आता भेटणार नाही या जाणिवेतून कामगारांच्या डोळय़ांतून नकळतपणे अश्रू झरले.

बजाज यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी त्यांचे निधन झाले. आकुर्डी येथील बजाज ऑटो कंपनीच्या प्रांगणात असलेल्या निवासस्थानी रविवारी सकाळी बजाज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठितांसह राजकीय नेते आणि बजाज ऑटोमध्ये काम करणाऱ्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

राहुल बजाज यांच्या निधनानंतर आकुर्डी येथील बजाज कंपनी आवारात त्याचे पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बजाज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर साडेअकरा वाजता सांस्कृतिक भवन प्रागण येथे पार्थिव नेण्यात आले. तिथे पोलीस पथकाच्या वतीने दुपारी बारा वाजता मानवंदना देणात आली. त्यानंतर दर्शन सुरू करण्यात आले. पोलीस पथकाच्या वतीने दुपारी बारा वाजता मानवंदना देणात आली. त्यानंतर दर्शन सुरू करण्यात आले. भर उन्हातही मोठ्या प्रमाणावर अनेक कामगारांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी ४ वाजता त्यांचे पार्थिव पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

राज्य शासनाच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राहुलकुमार बजाज यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून बजाज यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर बजाज यांच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज राजीव बजाज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. बजाज यांचे पुत्र राजीव व संजीव बजाज, कन्या, सुनयना केजरीवाल यांच्यासह बजाज परिवारातील सदस्यांनी अंत्यदर्शन घेतले. योगगुरू बाबा रामदेव, ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांच्यासह बजाज ऑटो कंपनीमधील कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments