३१ मार्च २०२१,
‘पॅन कार्ड’ला ‘आधार कार्ड’शी लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्याप पॅन आधारशी लिंक केले नसले तर तुमच्या जवळ अद्यापही संधी आहे. कारण जर तुम्ही ३१ मार्च २०२१ आधी ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीत तर तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते. कारण यापुढे सरकार यासाठी मुदत वाढ देण्याची शक्यता कमी आहे. सरकारने यासाठी ३१ मार्च २०२१ ही अंतिम मुदत दिली आहे.
‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक न केल्यास होणारे नुकसान – जर तुम्ही३१ मार्च २०२१ पर्यंत आपल्या आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते.आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्याने पॅन कार्ड रद्द झाल्यास तुम्हाला पुन्हा पॅन कार्ड बनवण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसणार.
तुम्ही रद्द झालेल्या पॅन क्रमांकाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल केल्यास तेही मान्य होणार नाही.
पगार रोखला जाण्याची शक्यता – जर तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचा पगारही रोखला जाऊ शकतो. म्हणजेच पॅन कार्ड रद्द होण्यामुळे तुमचा पगार तुमच्या खात्यात जमा होऊ शकणार नाही. कारण कंपन्या करमर्यादेच्यावर असणाऱ्या पगारावर टीडीएस कापून घेतात. मात्र, तुमच्याकडील पॅन क्रमांक रद्द झाल्यास त्यांना हे करता येणार नाही. ज्यामुळे तुमच्या पगारावर संकट येऊ शकते. त्यामुळे जर तुमच्याकडे पॅन आणि आधार क्रमांक दोन्हीही असतील तर त्याला लिंक करुन घेणेच हिताचे ठरणार आहे.
‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक केल्याने होणारे फायदे – तुमचा पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक आहे तर तुम्हाला नवे बँक खाते सहजासहजी उघडता येणे शक्य आहे.‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक असेल तर तुम्हाला आयटीआर भरण्यासही यामुळे अडचण येणार नाही.तुम्ही जर गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर बाजाराचा विचार करत असाल तर कुठल्याही म्युच्युअल फंडाचे युनिट खरेदीसाठी आणि डिमॅट अकाऊंट सुरु करता येणे सोपे होईल. कारण, यासाठी पॅन आणि आधार क्रमांक लिंक करणे गरजेचे आहे.‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक असेल तर नवे डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्ड मिळवणेही अधिक सोयीस्कर होणार आहे.
तुम्ही आयकर विभागाच्या साईटवर डाव्या बाजूला ‘link adhaar’ या पर्यायावर क्लिक करावं. मात्र यासाठी आयकर विभागाच्या साईटवर तुमचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड गरजेचा आहे. https://incometaxindiaefiling.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्हाला पॅन आणि आधार लिंक करता येईल.