Wednesday, February 11, 2026
Homeआरोग्यविषयकलहुजी शक्ती सेनेचा जाहीर पाठिंबा; प्रभाग १७ मध्ये मनिषा आरसुळ यांच्या विजयासाठी...

लहुजी शक्ती सेनेचा जाहीर पाठिंबा; प्रभाग १७ मध्ये मनिषा आरसुळ यांच्या विजयासाठी मांतग समाज एकवटला

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मधील मांतग समाजाच्या उमेदवार मनिषा राजेश आरसुळ यांना क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. शंकरभाऊ तडाखे यांनी याबाबत अधिकृत पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, दळवीनगर, प्रेमलोक पार्क आणि शिवनगरी परिसरातून सामाजिक कार्यकर्ते राजेश आरसुळ यांच्या पत्नी मनिषा आरसुळ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून, त्या मांतग समाजाच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जात आहेत.

क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या पत्रानुसार, मनिषा आरसुळ या सामाजिक कार्यात सक्रिय असून महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवत समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी त्यांना पूर्ण सहकार्य व पाठींबा देण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

या पत्राद्वारे प्रभाग १७ मधील समस्त मांतग समाजाला आवाहन करण्यात आले असून, येत्या १५ तारखेला ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून मनिषा आरसुळ यांना प्रचंड बहुमताने विजयी करून महानगरपालिकेत पाठवावे, असे आवाहन शंकरभाऊ तडाखे यांनी केले आहे.

क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना व मांतग समाजाच्या या स्पष्ट भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक १७ मधील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून, प्रभाग क्रमांक १७ मधून संपुर्ण पॅनेल प्रचंड मताधिक्याने तसेच मनिषाताई निवडून येतील असा दृढविश्वास मांतग समाजाने व्यक्त केला आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments